आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर व्हिडिओ चित्रीकरण, स्टेशनरीची निविदा काढली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला-लोकसभा निवडणुकीसाठी आवश्यक विविध स्टेशनरी व व्हिडिओ चित्रीकरणाची ई निविदा अखेर शुक्रवार, 21 मार्च रोजी जिल्हा प्रशासनाने काढली. ही निविदा 21 ते 26 मार्च या कालावधीत प्रसारित करण्यात येईल. याविषयी निविदा प्रकाशित न करता एका र्मजीतील कंत्राटदारास काम देण्याचा घाट रचला जात होता. या विषयीचे ‘निवडणूक कामाची अद्याप निविदा नाही’ असे वृत्त 17 मार्च रोजी ‘दिव्य मराठी’ने प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत आज त्या संबंधीची ई निविदा काढण्यात आली.
कुठलीही निविदा न काढता जिल्हा परिषद निवडणुकीत काम केलेल्या व्यक्तीलाच कंत्राट देण्याचा घाट रचला जात होता. या माध्यमातून सुमारे एक कोटींच्या कामाच्या कुठल्याही निविदा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यापासून काढण्यात आल्या नव्हत्या. ही कामे र्मजीतील कंत्राटदारास देण्यासाठी त्याचे हित सांभाळण्याचा प्रयत्न करण्यात येणार होता. त्यामुळे कुठलीही निविदा प्रक्रिया न करता इतरांना नैसर्गिक न्यायानुसार संधी न देता एकाच कंत्राटदाराचा फायदा करण्याचा काहींचा उद्देश होता. त्यामुळे लोकसभा निवडणूक मुक्त व निष्पक्ष वातावरणात होत नसल्याचा संशय प्रशासनावर केंद्रित होत होता. या वृत्ताची दखल घेतल्याने आता निविदेचा मार्ग मोकळा झाला आहे.लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हय़ात 1,755 केंद्र आहेत. ज्या ठिकाणी मतदान होईल, या प्रत्येक केंद्राला मोठय़ा प्रमाणात स्टेशनरी लागते. तसेच या प्रत्येक केंद्रावर चित्रीकरण करण्यासाठी एक व्हिडिओग्राफर व कॅमेरामनची गरज असते. स्टेशनरीत 110 वस्तूंचा समावेश आहे चित्रीकरणासाठी प्रती कॅमेरा हा भाड्याने घ्यावा लागतो.
विधानसभा मतदारसंघ एकूण केंद्रांची संख्या
अकोट 271
बाळापूर 306
अकोला पश्चिम 228
अकोला पूर्व 301
मूर्तिजापूर 340
रिसोड 309
एकूण 1,755