आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यामध्ये लवकरच एलईडी बल्बचे वाटप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाशीम- राज्यातील सुमारे कोटी ७५ लाख घरगुती ग्राहकांना एलईडी बल्ब वाटप योजनेचा शुभारंभ मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधानभवनात झाला. या योजनेमुळे वार्षिक सुमारे १३०० दशलक्ष युनिट्सच्या विजेची बचत होणार असून कमाल मागणीच्या काळात सुमारे ५०० मेगावॅट विजेची मागणी कमी होईल, असा दावा महावितरण कंपनीने केला आहे. दरम्यान जिल्ह्यातही लवकरच या योजनेस सुरुवात केली जाणार असल्याची माहिती महावितरणाच्या सूत्रांनी दिली.

केंद्र शासनाने वीज बचतीसाठी घरगुती ग्राहकांना एलईडी बल्ब वाटपाची योजना तयार केली अाहे. या योजनेत घरगुती ग्राहकांना प्रत्येकी व्हॅट क्षमतेचे ते बल्ब देण्यात येणार आहेत. हे बल्ब १०० रुपये रोखीने अथवा १०५ रुपये दराने मासिक योजनेच्या हप्त्याने घेता येणार आहेत. तर बिलातून शून्य व्याजाने रक्कम वसूल केल्यामुळे ग्राहकांचा आर्थिक भार कमी होईल. शिवाय या योजनेचा वीज दरावर किंवा महावितरणवर कोणताही आर्थिक बोजा येणार नाही. तसेच तीन वर्षांत मोफत बल्ब बदलण्याचीही गॅरंटी राहणार आहे. केंद्र शासनाच्या ईईएसएल कंपनीद्वारे पारदर्शक निविदा प्रक्रियेने बल्ब खरेदी करणार आहे.
राज्यभरात विविध ठिकाणी स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधींच्या सहभागाने बल्ब वाटपाचे कार्यक्रम घेण्यात येणार आहे. तसेच परिमंडळातील घरगुती ग्राहकांना या योजनेत सहभागी करून घेण्याचेही नियोजन सुरू असल्याचे महावितरणच्या जनसंपर्क विभागाने कळवले आहे. विजेची निर्मितीसोबतच विद्युत बचत देखील महत्वाची आहे. त्याचाही विचार करणे गरजेचे झाले आहे.

बल्ब वाटप कक्ष उभारणार
यायोजनेतसहभागी होण्यासाठी ग्राहकास एसएमएस अथवा ई-मेलद्वारे प्रत्यक्ष कक्षावर भेटून बल्बसाठी नोंदणी करावी लागेल. योजनेच्या अंमलबजावणीसाठी महावितरणचे शाखा कार्यालय, बिल भरणा केंद्र इतर िठकाणी बल्ब वाटप कक्ष उघडण्यात येणार आहेत. ईईएसएल कंपनीमार्फत घरपोच सेवेची व्यवस्थाही करण्यात आली अाहे.
बातम्या आणखी आहेत...