आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काठमांडू येथून अकोला निर्माण फर्टिलाझर शेतकरी आज परतणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - नेपाळला झालेल्या भूकंपात अकोल्याच्या निर्माण फर्टिलायझर कंपनीचे ५५ शेतकरी व्यापारी काठमांडूत अडकले आहेत. रविवारी त्यांनी परतण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी ते विमानतळापर्यंत पोहोचले होते. मात्र, त्यांचे विमानच आल्याने त्यांना परतावे लागले. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय पर्यटकांची सोय केली आहे.
काठमांडू येथील वैशाली हॉटेलमध्ये सर्व भारतीयांचा मुक्काम आहे. मात्र, रविवारी दुपारी भूकंपाचे चार सौम्य धक्के आल्यामुळे येथील नागरिक जीव मुठीत घेऊन आहेत. हॉटेलमध्ये थांबण्यास भीती वाटत असल्यामुळे सर्वच आत-बाहेर करत असून, हॉटेलच्या बाहेरच सर्वांनी ठिय्या दिला आहे. अडकलेले नागरिक देवाचे नामस्मरण करत आहेत. निर्माण कंपनीतर्फे ५५ शेतकरी विक्रेते अभ्यास दौऱ्यासाठी नेपाळ गेले होते.
शनिवारी सकाळीच ते काठमांडूला पोहोचले होते. त्यानंतर ११ वाजता भूकंप झाल्याने त्यांचा संपर्क तुटला होता. मात्र, सायंकाळी त्यांचा संपर्क खासदार संजय धोत्रे यांच्याशी झाला होता. त्यानंतर त्यांनी भारतीय दूतावासाशी आणि परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून अडकलेल्यांची माहिती दिली होती.

वीज नसल्यामुळे संपर्क नाही : वीज पुरवठाखंडित झाल्यामुळे काठमांडू येथे असलेल्यांचा संपर्क होत नाही. सर्वांजवळ मोबाइल आहेत. पण, मोबाइल चार्जिंग करण्यासाठी वीजपुरवठा नसल्यामुळे दळणवळण व्यवस्था ठप्प झाली आहे. त्यामुळे अंधारात रात्र काढावी लागत असल्यामुळे भयाण शांतता जाणवत असल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नियंत्रण कक्षाशी संपर्क साधा

अकोलाजिल्ह्यातील काही नागरिक नेपाळ येथे गेले असतील तर त्यांची ओळखपत्रासह माहिती घेऊन अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. तसेच अधिक माहितीसाठी ०७२४-२४२४४४४ येथे संपर्क साधावा.

लँडिंगसाठी अडथळा

काठमांडू येथील विमानतळही काहीअंशी क्षतिग्रस्त झाले असून धावपट्टी खराब झाल्याने एकावेळी एकच विमान विमानतळावर उतरत अाहे. रविवारी नागरिकांना आणणे शक्य झाले नाही. सोमवारी दुपारी वाजता महाराष्ट्रातील अडकलेले नागरिकांचे विमान मुंबईसाठी उड्डाण घेणार आहे.