आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावती- मोर्शी (सिंभोरा) येथील धरणावर असलेले भूकंपमापक यंत्र गेल्या चार दिवसांपासून बंद आहे, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. विशेष असे, की भूकंपमापक यंत्रातील हा बिघाड जिल्हा प्रशासनाला माहिती नव्हता. त्यामुळे धारणीतील धरणीकंपानंतर त्यांची खूप धावपळ उडाली.
भारतासह जगभरातील भूकंपाची तीव्रता मोजण्याचे यंत्र अप्पर वर्धा धरणावर आहे. परंतु शनिवारी 21 तारखेला या यंत्रात बिघाड झाला. त्यामुळे पुणे येथील महाराष्ट्र इंजिनीअरिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूटला (मीरी) कळवल्याचे यंत्रणेचे म्हणणे आहे. मात्र, याची सुतरामही कल्पना महसूल यंत्रणेला नव्हती. परिणामी धारणी तालुक्यातील साद्राबाडी येथे मंगळवारी रात्री जाणवलेले धक्के भूकंपाचे की आणखी कशाचे, हे अजूनही स्पष्ट झाले नाही.
धरणीकंपाची ही घटना घडल्यानंतर ‘मीरी’चे सहा सदस्यीय पथक बुधवारी सायंकाळी पुण्याहून येथे दाखल झाले असून, ते सिंभोरा येथे रवाना झाले आहेत. भूकंपमापक यंत्राची पाहणी केल्यानंतर त्यातील नेमका दोष त्यांच्या लक्षात येईल. त्यानंतर त्याची दुरुस्ती आणि इतर बाबींसाठी काय करावे लागेल, याचा अंदाज घेतला जाणार आहे. आमच्या प्रतिनिधीने त्याबाबत जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. मात्र, चमू दाखल झाली आणि सिंभोराकडे रवाना झाली, याशिवाय दुसरे उत्तर त्यांच्याकडून मिळू शकले नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.