आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Economic Development Corporation,Latest News In Divya Marathi

ब्राह्मण युवकांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे- ब्राह्मण महासंघ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- ब्राह्मण युवकांना व्यवसायासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, या मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले.ब्राह्मण समाज हा सुशिक्षित, पुढारलेला व आर्थिकदृष्ट्या सुबत्तेत राहणारा समाज म्हणून मानल्या जातो. काही अंशी हे खरे असले तरी आज हजारो ब्राह्मण कुटुंबे दारिद्रय़रेषेखाली आहेत. त्यामुळे ब्राह्मण समाज आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. अनेकांकडे शेती नाही, बोटावर मोजण्याइतके व्यावसायिक आहेत, तर नोकर्‍या मिळेनाशा झाल्या आहेत. बहुसंख्य कुटुंबांना शाश्वत चरितार्थाचे साधनच उरले नाही. यामुळे या समाजातील अनेकांना जीवन जगणे कठीण झाले आहे. ब्राह्मण समाजातील युवकांना नोकरी मिळत नसल्याने किमान त्यांना व्यवसाय सुरू करता यावा, यासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे.
पुरोहितांचे काम करणार्‍यांना पाच हजार रुपये मानधन देण्यात यावे, समाजाला मानसिक आणि कायदेशीर सुरक्षितता लाभावी यासाठी ब्राह्मण समाजाचा समावेश अँट्रॉसिटी कायद्यामध्ये करावा आदी मागण्यांचा समावेश आहे. निवेदन देतेवेळी आमदार गोवर्धन शर्मा, गोविंद कुळकर्णी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.