आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Economic Terrorism, Latest News In Divya Marathi

एकजूटीने थोपवू आर्थिक आतंकवाद, डॉ.गिरीश जाखोटिया यांचे प्रतिपादन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- समाजात आर्थिक आतंकवाद कसा पोसला जातो, याची आम्हाला माहिती नसते. आर्थिक आतंकवादाचे दृश्य अदृश्य असे स्वरूप असते. फक्त खासगी क्षेत्रात वाढल्याने आर्थिक आतंकवाद कमी होणार नाही. आर्थिक आतंकवादाचा वेढा आणखी वाढणारच आहे. समाजाची एकी बळकट असल्यास आर्थिक आतंकवादाचे हल्ले परतवून लावू शकतो. एकजूट, सहकार्याने आर्थिक आतंकवाद थोपवता येतो, असे प्रतिपादन मुंबई येथील लेखक, आर्थिक सल्लागार डॉ. गिरीश जाखोटिया यांनी केले. प्रमिलाताई ओक सभागृहात सुरू असलेल्या नवरात्र व्याख्यानमालेत 11 ऑक्टोबर रोजी त्यांनी आठवे पुष्प गुंफले.
बाबूजी देशमुख वाचनालयाच्या वतीने आयोजित या व्याख्यानमालेत डॉ. गिरीश जाखोटिया यांनी ‘आर्थिक आतंकवाद’ याविषयी मार्गदर्शन केले. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापण्यापूर्वी आर्थिक आतंकवाद संपवला होता. आज आपण सांस्कृतिक, सामाजिकदृष्ट्या एकत्र येतो. त्याप्रमाणे आर्थिकदृष्ट्या एकत्र यायला हवे. आम्ही एकत्र येत नाही, त्यामुळेच आज आर्थिक आतंकवाद पोसला जात आहे. कनिष्ठ, मध्यमवर्गीय एकत्र आले, तर आर्थिक संकटांचा मुकाबला करता येतो.
एका गावातील शंभर शेतकरी एकत्र आल्यास 200 ते 300 एकर जमिनीच्या एकत्रीकरणातून फायदा होऊ शकतो. यातून कर्ज उभे राहू शकते, शिवाय विविध उद्योगदेखील करता येते. हे मॉडेल प्रत्येक गावात उभारले तर शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर आळा बसेल तसेच प्रगतीदेखील होईल. शेतकरी आत्महत्येचे अहवाल तयार करण्यापेक्षा उपयोगी मॉडेल तयार केले पाहिजे.वेगवेगळ्या गटातील व्यक्ती एकत्र आल्याने विविध घटकांचा अभ्यास करता येतो. सार्वजनिक क्षेत्रात कार्यक्षमता भरपूर आहे, पण त्याला वाव मिळत नाही. नोक-या आहेत, पण तेथपर्यंत पोहोचण्यासाठी क्षमता नाही. उद्योगांमध्ये नोकऱ्या मिळवण्याची क्षमता निर्माण केली पाहिजे. अनेक वेळा सरकारसुद्धा आर्थिक आतंकवाद लादत असते, असे त्यांनी सांगितले.