आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Education And Career Fair 2014 Held At Akola, Divya Marathi

30 मेपासून ‘दिव्य मराठी’तर्फे दिव्य एज्युकेशन अँड करिअर फेअर 2014 चे आयोजन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- दहावी, बारावीनंतर पुढचा प्रवेश आणि योग्य करिअर हा विद्यार्थ्यांसमोरील यक्ष प्रश्न असतो. तो सोडवण्यासाठी दैनिक दिव्य मराठीने पुढाकार घेतला असून, शुक्रवार 30 मे ते रविवार 1 जून दरम्यान ‘दिव्य एज्युकेशन अँड करिअर फेअर 2014’ चे आयोजन केले आहे.
परीक्षा संपल्यानंतर मुलांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते. हे मार्गदर्शन एकाच छताखाली सहज उपलब्ध होत नाही. विद्यार्थ्यांची ही गरज ओळखून एकाच छताखाली प्रथितयश शैक्षणिक संस्था व त्यांच्याकडे उपलब्ध शाखांची माहिती मिळावी, म्हणून दिव्य एज्युकेशन अँड करिअर फेअरचे आयोजन केले आहे. या फेअरला दहा हजारांपेक्षा जास्त पालक व विद्यार्थी भेट देणार आहे. विविध माध्यमांच्या 65 अभ्यासक्रमांची माहिती मिळणार आहे. रतनलाल प्लॉटमधील चौधरी विद्यालयाच्या प्रांगणात 30 मे ते रविवार 1 जून दरम्यान, हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यामध्ये नामवंत शैक्षणिक संस्थांसह पुणे, नागपूर, नाशिक, वर्धा, जळगाव, औरंगाबाद, अमरावती येथील संस्थांचा सहभाग राहील. कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकीय आदींसह प्रवेशासाठी मार्गदर्शन लाभणार आहे.
स्टॉलची नोंदणी करा : या दिव्य एज्युकेशन अँड करिअर फेअरमध्ये आपल्याही संस्थेचा स्टॉल असावा, असे प्रत्येक संस्थेला वाटते, तर चला मग संपर्क साधून आपल्या स्टॉलची बुकिंग करून घ्यावी. बुकिंगसाठी व इतर जाहिरातीसाठी उपक्रमाचे प्रमुख विठ्ठल काकडे (8390045156) यांच्याशी किंवा दैनिक दिव्य मराठीच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.