आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Education As The Chairman Of The Committee, Who Have The Means?

शिक्षण व अर्थ समितीचे सभापतीपद कोणाकडे?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रतिनिधी - अकोला-जिल्हा परिषदेच्या शिक्षण व अर्थ समिती सभापतीपदासाठी विषय समिती सभापती म्हणून निवड झालेल्या काँग्रेसच्या राधिका पाटील आणि भारिप-बहुजन महासंघाचे रामदास मालवे यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. शिक्षण व अर्थ समिती सभापतीपदाच्या खुर्चीवर कोण आरूढ होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

विषय समिती सभापतींची सोमवारी निवड करण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई व उपाध्यक्ष देशमुख गुलाम हुसेन गुलाम नबी देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत समाजकल्याण सभापती आणि महिला व बालकल्याण सभापतीची निवड झाली. शिक्षण व अर्थ समिती, कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापतीपदाची निवड राहिली आहे. भारिप-बहुजन महासंघातर्फे रामदास मालवे व काँग्रेेसतर्फे राधिका पाटील दावेदार आहेत. शिक्षण व अर्थ समितीचे सभापतीपदा या दोघांपैकी कोणाला मिळणार, याबाबत पदाधिकार्‍यांना उत्सुकता लागली आहे.
फॉर्म्युला बदलणार काय?

मागील वेळी काँग्रेसचे पंढरीनाथ हाडोळे यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन सभापतीपद होते. हाच फॉर्म्युला यावेळीही राहणार असल्याचे राजकीय सूत्रांनी सांगितले. त्यामुळे रामदास मालवे यांना शिक्षण व अर्थ समिती सभापतीपद मिळण्याची चिन्हे आहेत. हा फॉर्म्युला बदलला तरच राधिका पाटील यांची वर्णी लागेल.

शिक्षण’साठी दोघेही इच्छुक

शिक्षण व अर्थ समितीच्या सभापतीपदासाठी राधिका पाटील व रामदास मालवे हे दोघेही इच्छुक आहेत. राधिका पाटील यांनी ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या प्रतिक्रियेत महिलांच्या शिक्षणावर भर देण्याची अपेक्षा व्यक्त केली. त्यामुळे त्यांचा कल शिक्षण विभागाकडे असल्याचे दिसत आहे. रामदास मालवे यांचीही रुची शिक्षण व अर्थ विभागात असल्याचे प्रतिक्रियेवरून दिसले.

फॉर्म्युला बदलणार काय?

मागील वेळी काँग्रेसचे पंढरीनाथ हाडोळे यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन सभापतीपद होते. हाच फॉर्म्युला यावेळीही राहणार असल्याचे राजकीय सूत्रांनी सांगितले. त्यामुळे रामदास मालवे यांना शिक्षण व अर्थ समिती सभापतीपद मिळण्याची चिन्हे आहेत. हा फॉर्म्युला बदलला तरच राधिका पाटील यांची वर्णी लागेल.