आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणाधिकारी शाळेत अन् गेटला कुलूप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - चौकशीसाठी गेलेल्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकार्‍यांना मुख्याध्यापिकेने तब्बल तीन तास शाळेच्या प्रवेशद्वारावरच ताटकळत ठेवले. शिक्षणाधिकारी जाईपर्यंत शाळेचे गेट प्रशासनाने उघडले नाही. हा प्रकार शुक्रवारी सकाळी बाळापूर तालुक्यातील अंदुरा येथील श्री जगदेवराव वराडे विद्यालयात घडला.

आम आदमी विमा योजनेंतर्गत अंदुरा येथील जगदेवराव वराडे विद्यालय प्रशासनाने २०१३-१४ या वर्षातील पैसे जमा झाले असतानासुद्धा ४९ विद्यार्थ्यांना वितरित केले नाहीत. त्यामुळे पालकांनी जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभाग शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची चौकशी करण्यासाठी आज शिक्षणाधिकारी अशोक सोनवणे शाळेत पोहोचले. या वेळी त्यांच्यासोबत तक्रारकर्ते पालक, सरपंच भगत होते. सकाळी १०.२५ वाजता शिक्षणाधिकारी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ दाखल झाले. मात्र, मुख्याध्यापिकेने कोणताही रिस्पाॅन्स दिल्याने प्रकरणाची चौकशी होऊ शकली नाही.

मुख्याध्यापिकेचा नो रिस्पाॅन्स : चौकशीसाठीगेलेल्या शिक्षणाधिकार्‍यांना चौकशीकामी मुख्याध्यापिका घाटे यांनी सहकार्य तर केलेच नाही, शिवाय गेटसुद्धा उघडले नाही. या प्रकाराने शिक्षणाधिकार्‍यांसह पालकांना त्रास सहन करावा लागला. चौकशीसाठी गेलेल्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकार्‍यांना गेटवरच तीन तास थांबावे लागले.

पैसे कुणी खाल्ले
आमआदमी योजनेचे पैसे शासनाकडून आल्यावरही विद्यार्थ्यांना त्याचे वाटप झाले नाही. मग पैसे गेले तरी कुठे, असा सवाल संतप्त पालकांनी या वेळी केला. काहीही करा साहेब पण आम्हाला पैसे द्या, असा सवाल या वेळी पालकांनी शिक्षणाधिकार्‍यांकडे केला.
बातम्या आणखी आहेत...