आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Education Officer News In Marathi, Acamedic, Divya Marathi

शिक्षणाधिकार्‍यांनी दिले एकाच दिवशी दोन आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - सन 2014-15 या शैक्षणिक वर्षापासून जिल्हा परिषदेच्या इयत्ता चौथीला पाचवीचा आणि सातवीला आठवीचा वर्ग जोडण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शिक्षणाधिकारी प्रफुल्ल कचवे यांनी गटशिक्षणाधिकारी आणि विस्तार अधिकार्‍यांना चौथी आणि सातवीतून पुढील वर्गात गेलेल्या विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र देऊ नये, असे तोंडी आदेश शनिवारी 3 मे रोजी सकाळी दिले होते. मात्र, शिक्षण संचालक कार्यालयाकडून त्यांना काही आदेश न आल्याने त्यांनी सायंकाळी पुन्हा दूरध्वनी करून विद्यार्थ्यांची टी.सी रोखू नका, असे आदेश गटशिक्षणाधिकार्‍यांना दिले आहेत. विशेष म्हणजे माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी तोंडी आदेश कसे देता, अशी विचारणा सुरू केल्यावर उपरोक्त आदेश शिक्षणाधिकार्‍यांना बदलावा लागल्याची माहिती आहे.

माध्यमिक शाळांचे वर्ग हे पूर्वी आठव्या वर्गापासून सुरू होत होते. मात्र, शिक्षणाच्या आकृतीबंधात यंदापासून जेथे सातवा वर्ग आहे अशा शाळांना आठवा वर्ग जोडण्यात येणार आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षण आता वर्ग 1 ते 8 पर्यंत विस्तारित केले आहे. सातवीतून आठवीत जाणारे विद्यार्थी हे माध्यमिक शाळांमध्ये दाखल होत असत. शिक्षकांची पदनिश्चिती, विद्यार्थ्यांची पटपडताळणी पूर्ण केली नाही किंवा पाचव्या ,आठव्या वर्गासाठी शिक्षकांची नेमणूकही केली नसताना, विद्यार्थ्यांचे प्रवेश पुढील वर्गात होतील मात्र त्या विद्यार्थ्यांचे काय, असा प्रश्‍न निर्माण झालो. विद्यार्थ्यांना टि.सी. देऊ नये, आवश्यक असेल तर देण्यास हरकत नाही, असे तोंडी आदेश शिक्षणाधिकार्‍यांनी शनिवारी सकाळी दिले होते. सायंकाळी मात्रा मुख्याध्यापकांमध्ये खळबळ उडाल्याने हा आदेश त्यांनी मागे घेत पाचवा आणि आठवा वर्ग जोडण्यात येणार्‍या शाळांची यादी तयार नसल्याचे कारण पुढे करून, विद्यार्थ्यांच्या टी.सी. रोखू नयेत, असे शिक्षणाधिकारी प्रफुल्ल कचवे यांनी सांगितल्याने माध्यमिक शिक्षकांची घालमेल संपली आहे.

विद्यार्थ्यांना टी.सी. द्या
यंदापासून इयत्ता चौथीला पाचवी आणि सातवीला आठवा वर्ग जोडणार असल्याने तसे आदेश दिले होते. मात्र, लेखी आदेश न आल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होण्याची शक्यता होती. त्यामुळे पुन्हा आदेश देऊन विद्यार्थ्यांना टी.सी. देण्याचे गटशिक्षणाधिकारी आणि विस्तार अधिकार्‍यांना सांगितले आहे.’’ प्रफुल्ल कचवे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक