आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संच मान्यतेच्या निकषामुळे खासगी शिक्षण संस्था अडचणीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - मान्यताप्राप्त खासगी अंशत: पूर्णत: अनुदानित माध्यमिक व सैनिकी शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांसाठी सुधारित आकृ तिबंध निश्चित केला आहे. त्या आकृतिबंधानुसार, जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांवरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरणार आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्थाचालक अडचणीत आले आहेत.

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी निश्चितीचे निकष शिक्षण विभागाने बदलल्यामुळे आता संच मान्यता दिलेल्या खासगी शाळा अडचणीत येत आहे. आॅनलाइन माहिती भरल्यानंतर खासगी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरणार आहेत. संच मान्यतेचे निकष पूर्ण करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून, शैक्षणिक संस्थाची माहिती मागवणे सुरूच आहे. पाचवी ते आठवीसाठी तुकड्यांची संख्या आता ठेवण्यात आली नसून, फक्त नववी व दहावीलाच तुकड्या राहणार आहे. विद्यार्थी संख्येवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची पदे निश्चित होणार आहे. जिल्ह्यातील 472 खासगी शैक्षणिक संस्थेत निकषापेक्षा अतिरिक्त संख्या शिक्षकांची आहे. सहावी ते आठवीला शिकवणारे शिक्षक हे डीटीएड झालेले शिक्षक आहे. त्यांना आता शिकवता येणार नाही. त्यामुळे या पदावर पदवीधर शिक्षक राहणार आहे.

चाळीस प्रस्ताव दाखल
जिल्हयात संच मान्यते नुसार भरलेल्या प्रस्ताव मागविण्यात आला होता. त्यापैकी चाळीस शाळांनाी प्रस्ताव पाठविला आहे.
आॅनलाइनचे सॉप्टवेअर : शाळांना माहिती भरून देण्यासाठी सॉप्टवेअर उपलब्ध करून दिले आहे. त्या आराखड्यात माहिती भरून द्यावी लागणार आहे. त्यामुळे शिक्षण संस्था माहिती भरत आहेत. ही माहिती आता निकषानुसार समोर येत असल्याने अतिरिक्त कर्मचार्‍यांची माहिती उघड होणार आहे.
चतुर्थ श्रेणी पदाकरिता
200 पर्यंत एक , 201 ते 400 पर्यंत दोन, 401 ते 600 पर्यंत तीन, 601 ते 800 पर्यंत चार, 801 ते 1200 पर्यंत पाच, 1201 ते 1600 पर्यंत सहा व त्यापुढे सात चतुर्थ श्रेणी पदांचा निकष ठेवण्यात आला आहे.
माहिती घेणे सुरू आहे
अद्याप शाळांची माहिती येणे सुरूच आहे. माहिती पुणे येथे पाठवत आहे. त्यामुळे अतिरिक्त किती ठरतील, याची संख्या निश्चित सांगता येणार नाही. परंतु, संस्थांवर ही टांगती तलवार आहे, अशी माहिती शिक्षण विभागाक डून मिळाली.

उच्च माध्यमिक व सैनिकी शाळा कर्मचारी
500 विद्यार्थी संख्या :
1 कनिष्ठ लिपिक
501 ते 1000 पर्यंत : एक वरिष्ठ व कनिष्ठ लिपिक
1001 ते 1600 पर्यंत : दोन कनिष्ठ व एक वरिष्ठ लिपिक
2201 ते 2800 पर्यंत : तीन लिपिक व एक वरिष्ठ लिपिक
2800 पेक्षा जास्त : तीन कनिष्ठ व एक वरिष्ठ लिपिक