आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे रुळावर येण्यासाठी लागतील आठ दिवस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - वर्धा येथून काही अंतरावर असलेल्या सिंधी-तुळजापूरदरम्यान शुक्रवारी रेल्वे रुळाखालील भराव वाहून गेला होता. त्यामुळे मध्य रेल्वेची सेवा पूर्णत: बाधित झाली होती. गाड्यांना वेळेवर धावण्यास आणखी आठ दिवस लागणार असल्याची माहिती अकोला रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली.

रेल्वे रुळाखालील माती गिट्टीचा भराव वाहून गेल्याने रेल्वेची वाहतूक बंद झाली होती. त्यामुळे काही गाड्या नरखेड मार्गे वळवण्यात आल्या होत्या. मात्र, सोमवारी रेल्वे कर्मचार्‍यांच्या अथक पर्शिमाने डाऊनची लाइन सुरू झाल्याने प्रवाशांनी गैरसोय टळली. मंगळवारी नागपूरहून सुटणारी विदर्भ- मुंबई एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेस आणि सेवाग्राम-मुंबई एक्स्प्रेस या तीन गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली, तर बुधवारी मुंबई-नागपूर लाइन कुठल्याही मार्गाने न वळवता डाऊनलाइनवरूनच सर्वच गाड्या धावल्यात. मात्र एकाच लाइनवरून गाड्या धावत असल्याने सर्वच गाड्या जवळपास एक तास उशिराने धावल्या. हावड्याहून धावणार्‍या गाड्यांना दोन दिवसांपेक्षा अधिक अवधी लागत असल्याने गाड्यांना वेळा भरून काढण्यास उशीर लागणार आहे, त्यामुळे आणखी आठ दिवस गाड्यांना वेळा भरून काढण्यास लागणार आहेत.


गाड्या पूर्ववत होण्यासाठी अवधी
सर्वच गाड्या पूर्ववत सुरू झाल्या आहेत. हावड्यासाठीच्या गाड्यांना दोन दिवसांपेक्षा अधिक वेळ लागत असल्याने या गाड्या वेळेवर धावण्यासाठी काही दिवस लागणार आहे. बी.एस. भट, स्टेशन प्रबंधक.