आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लढतींचे चित्र बुधवारी होणार स्पष्ट;सातही विधानसभा मतदारसंघांमध्ये उलथापालथीची चर्चा अधिक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात तब्बल १८६ जणांनी २८० नामांकन अर्ज दाखल केले असले तरी प्रत्यक्षात २९ सप्टेंबरला होणारी छानणी आणि ऑक्टोबरला नामांकन अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्रत्यक्ष लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे.

जिल्ह्यातील बुलडाणा, चिखली, मेहकर, सिंदखेडराजा, खामगाव, जळगाव जामोद आणि मलकापूर, मेहकर विधानसभा मतदार संघात नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांनी घटस्थापनेचा मुहूर्त निवडत मोठी गर्दी केली होती. २७ सप्टेंबर ही नामांकन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असल्याने दुभंगलेली महायुती विस्कटलेल्या आघाडीतील पक्षांना काही मतदारसंघात उमेदवारांची शोधाशोध करण्याची मोठी कसरत करावी लागली.
दरम्यान, राजकीय उलथापालथ मोठ्या प्रमाणावर झाली. मात्र अद्याप मतदारांमध्ये संभ्रमावस्था असून जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदार संघातील लढतींचे चित्र ऑक्टोबरला नामांकन अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट होणार आहे. त्यातच २९ सप्टेंबरला छाणनी होणार असून त्यात तांत्रिक अडचणीमुळे कोणाचे अर्ज बाद होतात, हे सायंकाळपर्यंत स्पष्ट होईल. त्यानंतर खऱ्या प्रचाराला प्रारंभ होणार आहे.

आघडी, महायुती तुटल्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी होणार असल्याचे दै. दिव्य मराठीने २६ सप्टेंबरच्या अंकात स्पष्ट केले होते. त्यानुषंगाने राजकारणात दोन दिवस वेगवान घडामोडी घडून काँग्रेसचे बुलडाण्यात आमदार राहिलेले धृपदराव सावळे यांनी राष्ट्रवादीची कास धरत चिखलीतून नामांकन अर्ज दाखल केला. काँग्रेसमध्ये हयात गेलेले डॉ. यागेंद्र गोडे यांनी थेट पक्षीय विचारधारेलाच बगल देत भाजपची साथ धरत बुलडाण्यातून भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. तर काँग्रेसची उमेदवारी नाकारल्यामुळे मलकापूरातून उमा तायडे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादीतर्फे स्वाती वाकेकर यांनी मिळालेली उमेदवारी नाकारल्याने वेळेवर जळगाव जामोदमध्ये काँग्रेसचे प्रकाश ढोकणे यांना पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी देण्यात आली.
मेहकरमध्येही वेळेवर मंदाकिनी कंकाळ यांच्या गळ्यात राष्ट्रवादीच्या उमेदवारीची माळ पडली. भाजपमध्येही एबी फॉर्मचा गोंधळ होऊन अॅड. व्ही. डी. पाटील उमेदवार म्हणून जाहीर झाले असतानाच योगेंद्र गोडे यांना तिकीट मिळाले. या व्यतिरिक्त भाजप, शिवसेनेच्या काही नेत्यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सध्या जिल्ह्यातील राजकारणामध्ये संभ्रमावस्था असून ऑक्टोबरला यातील काहींनी अर्ज मागे घेतल्यास तगड्या राजकीय पक्षांसमोर बंडखोरीचे आव्हान उभे ठाकणार एवढे निश्चित. त्यातच चिखलीमध्ये उमेदवारीसाठी इच्छूक असलेल्या स्वाभिमानीचे रविकांत तुपकर यांनीही वेळेवर भाजप पाठिंबा जाहीर केला.