आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारिप-बमसं उमेदवाराची भूमिका ठरणार निर्णायक , मतांच्या ध्रुवीकरणावरच उमेदवारांच्या गणित अवलंबून!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - गेल्याचार विवडणुकीपासून भाजप-सेना युतीला साथ देणाऱ्या अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील विजयाच्या गणितात बदल झालेला नाही. मतांच्या ध्रुवीकरणावरच विजयी उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. त्यामुळेच भारिप-बमसं या ध्रुवीकरणात किती महत्त्वाची भूमिका निभावतो, याबाबत आतापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे.
एकेकाळी काँग्रेसचे वर्चस्व असलेला हा मतदारसंघ १९९५ पासून भाजप-सेना युतीच्या ताब्यात आहे. १९९५ ते २०१४ या पाचही निवडणुकीत युतीचा उमेदवार बदलला नाही. १९९५ च्या निवडणुकीत गोवर्धन शर्मा यांचा माजी राज्यमंत्री (कै.) अरुण दिवेकर, १९९९ च्या निवडणुकीत माजी राज्यमंत्री अजहर हुसेन तर २००४ २००९ च्या निवडणुकीत रमाकांत खेतान यांच्याशी मुकाबला झाला. पहिल्या निवडणुकीत ३० हजारांपेक्षा अधिक मताधिक्याने गोवर्धन शर्मा निवडून आले. त्यानंतर हे मताधिक्य त्यांना टिकवता आले नाही, परंतु पराभवही झाला नाही.
अकोला पश्चिम अस्तित्वात येण्यापूर्वी या मतदारसंघाला अकोला विधानसभा मतदारसंघ म्हटल्या जात होते. परंतु, २००९ च्या निवडणुकीत बोरगावमंजू विधानसभा रद्द करून त्याऐवजी अकोला पूर्व आणि अकोला पश्चिम असे दोन मतदारसंघ अस्तित्वात आले. बोरगावमंजू मतदारसंघात येणारा कौलखेड परिसर अकोला पश्चिमला जोडण्यात आला. त्यामुळे अकोला पश्चिममध्ये संपूर्णपणे अकोला शहराचा भाग आहे, तर अकोला पूर्वमध्ये महापालिका क्षेत्रासह ग्रामीण भागही जोडण्यात आला आहे. मुस्लिम मतदारांचे प्राबल्य असलेल्या या मतदारसंघात मतांच्या ध्रुवीकरणाचा फायदा युतीला होतो. हा आजवरचा अनुभव आहे.
१९९५ च्या निवडणुकीत युतीच्या लाटेत तसेच गोवर्धन शर्मा यांचा दांडगा जनसंपर्क, सहज उपलब्धता या बळावर ही जागा युतीने जिंकली. १९९९ च्या निवडणुकीत काँग्रेसने माजी राज्यमंत्री अजहर हुसेन यांना मैदानात उतरवले. अजहर हुसेन यांनी चांगली फाइट दिली. मात्र, काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला तर गोवर्धन शर्मा यांनी आठ हजाराच्या फरकाने ही जागा कायम ठेवली.