आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बसपामुळे रिपाइं मतांचे विभाजन, अकोला पूर्वमध्ये बसपाचा उमेदवार जाहीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अन्यपक्षांच्या उमेदवारांची चाचपणी सुरू असली, तरी अकोला पूर्व मतदारसंघात बहुजन समाज पक्षाने भानुदास कांबळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. बसपाने पूर्व विदर्भात दबदबा निर्माण केला होता. परंतु,पश्चिम विदर्भात मात्र पक्ष अद्यापही चाचपडत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे भारिप-बमसंचे या भागातील वर्चस्व कमी करण्यात बसप उमेदवार किती यशस्वी ठरतात, याविषयी चर्चा होऊ लागली आहे.

२००९ च्या निवडणुकीत शंकरराव कृष्णराव इंगळे बसपाचे उमेदवार होते. त्यांना १४४९ (०.९८ टक्के) मते मिळाली हाेती. या निवडणुकीत बसपने कांबळे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. नवीन चेहरा दिल्याचा कितपत फायदा बसपाला होतो, पाहायचे. कारण या मतदारसंघात रिपाइंची पकड मजबूत आहे. त्यातही भारिपचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा शब्द येथे परवलीचा असतो. बाळासाहेब म्हणतील त्याप्रमाणे निर्णय होतो. या भागातीलच नव्हे, तर अकोला जिल्ह्यातील रिपाइंची ताकद वाढण्यामागे तो श्रद्धेचा भाग आहे. त्यामुळे रिपाइंच्या परंपरागत मतांना छेद द्यायचा, तर तशी तयारीही हवी.