अकोला - महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन ही कंपनीचे स्थापनेपासून हित जोपासत आली आहे. तरीही कामगारांच्या हितांकडे तीनही कंपनींचे दुर्लक्ष आहे. कंपन्यांनी कंपनीचे हित जोपासणाऱ्यांचे हित जोपासावे, असे मत सी. एस. बानुबाकोडे यांनी येथे मांडले.
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या वतीने जूनपासून आयोजित संघर्ष यात्रेचा आज, जूनला महावितरणच्या विद्युत भवनासमोर समारोप करण्यात आला. याप्रसंगी झालेल्या द्वारसभेत ते बोलत होते. महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, कुडाळ येथील अधिवेशनात घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करत असता २२ एप्रिल २०१५ राज्यातील वीज उद्योगातील महावितरण, महापारेषण महानिर्मिती कंपन्यांना कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर नोटीस देऊन तीनही कंपन्यांच्या व्यवस्थापनाला ३१ मे २०१५ पर्यंत यावर तोडगा काढण्यासाठी वेळ दिला. अन्यथा, आंदोलनाचा निर्णय अंमलबजावणीत आणावा लागेल, असा स्पष्ट इशारा दिला होता. तरीही तीनही कंपन्यांच्या व्यवस्थापनाने दखल घेतल्यामुळे २२ एप्रिलच्या नोटीसनुसार ते १० जूनदरम्यान संघर्ष प्रचार यात्रा हा आंोलनाचा पहिला टप्पा राज्यात राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. हे आंदोलन कोणत्या मागण्यांसाठी सुरू आहे, याची माहिती तळागाळातील कर्मचाऱ्यांना व्हावी, प्रचार-प्रबोधन व्हावे कामगारांची आंदोलनाची निश्चित मानसिकता तयार व्हावी म्हणून ही संघर्ष यात्रा काढण्यात आली. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतून मार्गक्रमण करत संघर्ष यात्रा आज जूनला अकोल्यात पोहोचली. सायंकाळी सहाला विद्युत भवनासमोर द्वारसभा घेऊन यात्रेची सांगता करण्यात आली. याप्रसंगी तीनही कंपन्यांतील ३२ हजार कंत्राटी आउटसोर्सिंग, प्रकल्पग्रस्त, कामगार, मयत कामगारांचे वारस अॅप्रेंटिसांच्या प्रश्नाकरिता तसेच १८ हजार सहायक, वीज सेवक, कायम पदावर सामावून घ्यावे. ९६ हजार नियमित कामगारांच्या मागण्या सोडवण्यात याव्यात. याबद्दल २२ जूनपर्यंत व्यवस्थापनाने तोडगा काढवा, अन्यथा आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. द्वारसभेला संघटनेचे सरचिटणीस सी. एन. देशमुख, उपाध्यक्ष सी. एस. बानुबाकोडे, एस. एम. खोले, पी. यू. वडे, ए. डी. सनगाळे, आर. एल. शेगोकार, एस. आर. झुंजारे, पी. आर. लोडम, व्ही. आर. भारती, अनिल कुळकर्णी, मोरेकरसह सभासद उपस्थित होते.
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनतर्फे २२ जूनपर्यंत कंपनी व्यवस्थापनाने तोडगा काढल्यास आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यास प्रारंभ करण्यात येईल. यामध्ये तीनही कंपन्यांच्या मुख्य कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेचे झोनल सचिव राजेश कठाळे यांनी कळवले आहे. महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या संघर्ष यात्रेची सांगता विद्युत भवनासमोर द्वारसभेने करण्यात आली.