आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकाऱ्यांची दिरंगाई : विहीर बांधली, मोटार बसवली पण पाण्याचा अद्याप पत्ता नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - धडक सिंचन विहीर रोजगार हमी योजनेतून शेतात विहीर बांधली. विहिरीला चांगले पाणी लागल्याने अनेकांनी मोटारसुद्धा बसवली. मात्र, महावितरण लघुसिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने शेतात अद्याप वीज मिळाली नाही. आपल्या शेतात मीटर बसवून घेण्यासाठी शेतकऱ्यांना महावितरण कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने ठोस पाऊल उचलत पाण्याच्या कायमस्वरूपी उपाययोजना उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पाण्याचा एकन्एक थेंब जिरवण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरू केले आहे. सोबतच गरजू दुर्बल घटकातील शेतकऱ्यांच्या शेतात विहिरीसुद्धा बांधून देण्याची मोहीम हाती घेतली आहे.
धडक सिंचन विहीर कार्यक्रम नरेगा विहीर कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात दोनशेहून अधिक विहिरींचे बांधकामसुद्धा पूर्ण झाले आहे. विहीर बांधकामासाठी शासनाने तत्काळ शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम अदा केली आहे. पण, विहीर बांधून एक वर्षाहून अधिक कालावधी उलटला तरी विहिरीवर महावितरणचे मीटर आले नसल्याने विहिरीतील पाण्याचा उपयाेेग शेतकऱ्यांना पिकासाठी करता येईनासा झाला आहे.

शेतकऱ्यांनावीज मीटरची प्रतीक्षा

सिंचन विहीर वीजपुरवठ्यासाठी लाभार्थी हिस्साही भरला. तरीसुद्धा शेतात वीज कनेक्शन देऊन त्यावर मीटर लावून देण्यासाठी शासकीय यंत्रणेकडून विलंब होत आहे. लघुसिंचन महावितरण विभागात समन्वयाचा अभाव या ठिकाणी दिसून येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
जिल्ह्यात २०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये १,५९४ कृषिपंप जोडण्या केल्या. उर्वरित जोडण्याचे काम जूनअखेरपर्यंत करण्यात येईल, असे वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांना जाब विचारणार

शेतकऱ्यांना वेळेत सर्व सुविधा मिळाल्याच पाहिजेत. अधिकाऱ्यांकडून विलंब होत असेल तर ही दुर्दैवी गोष्ट आहे. याचा जाब निश्चित महावितरण लघुसिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारल्याशिवाय राहणार नाही. '' रामदासमालवे, सभापती, कृषी पशुसंवर्धन, जि. प.अकोला.

विहिरीत पाण्याचा ठणठणाट

अकोला,अकोट, बाळापूर, बार्शिटाकळी, मूर्तिजापूर, पातूर तेल्हारा तालुक्यातील १५३ पैकी १४९ विहिरींना पाणी लागले आहे. विहिरीत पाण्याचा ठणठणाट आहे.

काहींना अनुदानाची प्रतीक्षा

अकोट,बार्शिटाकळी अकोला तालुक्यातील काही शेतकऱ्यांना अद्याप विहिरी बांधकामाच्या अनुदानाची रक्कम मिळाली नाही. अधिकाऱ्यांनी याची दखल घेत संबंधित शेतकऱ्यांना तत्काळ अनुदान वितरित करावे, अशी मागणी होत आहे.