आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Electricity Shortcoming Raises Before The Chief Secreatary

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'मुख्य सचिवांसमोर मांडणार मेळघाटातील विजेचा अभाव\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - राज्याचे प्रशासकीय प्रमुख असलेले मुख्य सचिव जयंत बांठिया यांच्यासमोर मेळघाटातील विजेचा अभाव व दूरसंचार यंत्रणेतील अडथळे हे दोन प्रमुख विषय मांडले जाणार आहेत. त्यांच्या मेळघाट भेटीनिमित्त गुरुवारी महसूल आयुक्त कार्यालयात तयारी सुरू होती.

मेळघाटची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी बांठिया दोन दिवसीय दौर्‍यानिमित्त येथे येणार आहेत. 16 ऑगस्टला सकाळी 6 वाजता ते अमरावतीत पोहोचतील. विर्शाम भवनात अधिकार्‍यांशी बोलणी केल्यानंतर थेट मेळघाटसाठी रवाना होतील. आरोग्य, शिक्षण, कुपोषण व वनवैभव जाणून घेणे हा त्यांच्या दौर्‍याचा प्रमुख उद्देश आहे. कुपोषणामुळे मेळघाटची कुप्रसिद्धी देशभर झाली आहे. नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्यात व त्यांना सोई-सुविधा मिळवून देण्यात शासन अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत काही मुद्दे न्यायालयातही पोचले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्य सचिवांच्या या दौर्‍याला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून प्रशासनासारखीच तयारी गैरसरकारी संघटनांनींही केली आहे.