आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईच्या ‘एलिफंटा लेणी’चे गणेशोत्सवात आकर्षण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शहरात गणेशोत्सवाची तयारी मोठय़ा उत्साहात होत असून, एकीकडे गणपती मूर्तीची निर्मिती सुरू आहे, तर दुसरीकडे गणेशोत्सव सभामंडप उभारणीला वेग आला आहे. गणेशभक्तांसाठी काही गणेशोत्सव मंडळांच्या वतीने विविध प्रकारच्या कला साकारण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने सभामंडप उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
गणेशोत्सवानिमित्त येथील गणेशोत्सव मंडळांमार्फत दरवर्षी विविध कला साकारल्या जातात. यामध्ये प्राचीन धार्मिक कथा, देखावे, तसेच सभामंडपाची सजावट करण्यात येते. यंदा र्शी गणेशाचे आगमन 29 ऑगस्ट रोजी होणार आहे. प्रसिद्ध असलेले मारवाडी प्रेस गणेशोत्सव मंडळ तसेच टीव्हीएस शोरूम जवळील गणेशोत्सव मंडळाच्या सभामंडप उभारण्याच्या तयारीला वेग आला आहे. मारवाडी प्रेस गणेशोत्सव मंडळातर्फे यंदा ‘एलिफंटा लेणी’ची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. लेणी उभारण्यासाठी 22 कारागीर कामाला लागले आहेत.
लेणीमध्ये अष्टविनायक दर्शन, लेण्यांवर धबधबे साकारण्यात येणार एलिफंटाच्या धर्तीवर साकारली लेणी
- मुंबई येथील जग प्रसिद्ध असलेली ‘एलिफंटा लेणी’च्या धर्तीवर यंदा लेणी साकारण्यात येत आहे. लेणीच्या निर्मितीसाठी 22 कारागीर कामाला लागले आहे. उपलब्ध जागेमध्ये लेणी बसवण्यासाठी डिझाइन आखून लेणी प्रत्यक्षात उभारली जात आहे.’’ बाबू बागळे, डेकोरेटर.
सभामंडपाचे वैशिष्ट्य
गणपती सभामंडपामध्ये दरवर्षीप्रमाणे 11 फूट उंच गणेशाची मूर्ती बसवण्यात येणार आहे. त्यानुसार सभामंडपाचे स्वरूपही भव्य करण्यात आले आहे. मंडपाच्या सजावटीसाठी थर्मोकॉलच्या साहाय्याने नक्षीदार सजावट करण्यात येणार असून, त्यामध्ये आकर्षक रंग भरण्यात येणार आहे. त्यामुळे यावर्षी लक्ष वेधून घेणारा मंडप राहणार आहे.
अशी होणार लेणी
मुंबईच्या लेणीची प्रतिकृती 15 हजार स्क्वेअर फूट क्षेत्रामध्ये साकारण्यात येणार आहे. लेणीची उंची 10 फूट राहिल. लेणीसाठी 1 हजार टोपल्या, प्लास्टर ऑफ पॅरिस, थर्मोकॉल आदी वस्तूंचा उपयोग करण्यात येत आहे. लेणीमध्ये दोन धबधबे साकारून निसर्गरम्य देखावा तयार होणार आहे. धबधब्यांसाठी वापरण्यात येणार्‍या पाण्याचे रिसायकलिंग होणार आहे.