आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Employee Use Right To Vote, Atest News Im Marathi

अकोला पूर्वमध्ये प्रतिसाद, कर्मचा-यांनी बजावला मतदानाचा हक्क

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- निवडणूक प्रक्रियेत व्यस्त असलेल्या कर्मचाऱ्यांनाही मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून त्यांच्यासाठी आज, १४ ऑक्टोबर रोजीच मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. अकोला पूर्व अकोला पश्चिम मतदारसंघांत कार्यरत असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

टपाली मतदानालासुद्धा महत्त्व आहे. निवडणुकीत काम करणारे कर्मचारी अधिकारीसुद्धा कोणत्या ना कोणत्या मतदारसंघातील मतदार असतात. त्यामुळे अशा कर्मचारी अधिकाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून ही व्यवस्था करून दिली जाते. या टपाली मतपत्रिकेचे काउटिंगसुद्धा १९ अॉक्टोबर रोजीच केले जाईल, अशी मािहती िनवडणूक उपजिल्हािधकारी उदय राजपूत यांनी दिली.
अकोला पूर्व मतदारसंघातील िनवडणूक कर्मचाऱ्यांनी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावला. िनवडणूक िनर्णय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी कर्मचारी अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देत मतदानासाठी आवाहन केले. या प्रक्रियेसाठी तहसीलदार संतोष िशंदे, तहसीलदार राजेंद्रसिंग जाधव, नायब तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांचे सहकार्य लाभले.