आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्मचाऱ्यांचा माहिती कोश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - सर्व कर्मचाऱ्यांची माहिती संग्रहित करण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. सर्व आहरण वितरण अधिकारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती यांना हे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी वेळापत्रक ठरवून देण्यात आले आहे.
माहिती सादर करणे पहिले प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याचा कालावधी १६ जून ते १५ ऑगस्ट असा आहे. त्यानंतर माहिती बरोबर असल्यास दुसरे प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याचा कालावधी सप्टेंबरपर्यंत आहे. माहिती नोंदणी करण्यासाठी अर्थ सांख्यिकी संचालनालयाच्या जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडून संगणकीय ऑनलाइन आज्ञावली तसेच लॉगीन आयडी पासवर्ड कार्यालयांना उपलब्ध करून देण्यात येणार अाहे.

...तर वेतनाला अडचण
वेबसाइटवरमाहिती संग्रहित झाल्याशिवाय कोणत्याही कार्यालयामार्फत वेतन देयक कोषागारात स्वीकारले जाणार नाही. त्यामुळे सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कामास प्राधान्य देऊन वेळेत काम पूर्ण करावे.'' डी.पी. पाटील, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, अकोला