आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Employment Guarantee Scheme,latest News In Divya Marathi

कामांचा श्रीगणेशा, पण शेवट केव्हा ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- महात्मागांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून कृषी विभागांतर्गत तयार करण्यात आलेले नालाबांध शेतरस्त्याची कामे अर्धवट स्थितीत पडून आहेत. अर्धवट झालेल्या या कामांची देयकेही संबंधित अधिका-यांनी काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार आहे.
शासनाने लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊनही जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या कामांना गती मिळेनासे चित्र आहे. कामांना गती यावी कामात पारदर्शकता यावी म्हणून शासनाने ग्राम स्तरावर ग्रामसेवकांना या कामांचे अधिकार दिलेत. मात्र, ग्रामसेवकांकडून या कामांना खीळ लावल्या जात आहे. अभियंत्यांना हाताशी धरून ग्रामसेवकांमार्फत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार या कामांमध्ये केला जात आहे. सुरुवातीला नालाबांध शेतरस्त्याची कामे ही ग्रामपंचायत स्तरावर व्हायची, मात्र गेल्या दोन महिन्यांपासून ही कामे कृषी विभागाकडे देण्यात आली आहेत. या कामांचा शुभारंभ तर मोठ्या थाटात झाला. मात्र, त्याचा शेवट केव्हा होईल, याची काहीही शाश्वती उरलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शेततळे नालाबांधची कामे अर्धवट िस्थतीत पडून आहेत. शासनाच्या कृषी विभागाच्या अखत्यारीतील ही कामे रेंगाळलेली असताना जिल्हा कृषी अधिकारी जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडून मात्र या कामांना गती देण्यासाठी कुठलेही प्रयत्न होताना दिसत नाहीत.
कामांनाखीळ : गरजूमजुरांच्या हाताला काम मिळावे त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटावा या उदात्त हेतूने सुरू करण्यात आलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेला जिल्ह्यात प्रामुख्याने कृषी विभागांतर्गत केल्या जात असलेल्या कामांना खीळ बसलेली दिसून येते.