आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता पंचायतराज सशक्तीकरण मोहीम , ग्रामविकासासाठी प्रशासनाने उचललेे पुढचे पाऊल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पंचायतराजबळकटीकरणासाठी शासनाने राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. ग्रामीण भागाचा उद्धार जास्तीत जास्त प्रमाणात कसा केला जाईल, या उद्देशाने या अभियानांतर्गत काम केले जाणार आहे.
ग्रामीण प्रशासन आणि सामाजिक आर्थिक विकास पंचायत महत्त्वाची भूमिका १९५० पासून ओळखली गेली आहे. पंचायतच्या योजनांचा लाभ लोकांना पोहोचवण्याची खात्री करणे शासनाला महत्त्वाचे वाटते. म्हणून पंचायत बळकट करण्यासाठीची गरज, समाजकल्याण आणि समाविष्ट कार्यक्रमांवर खर्च झालेल्या वाढीमुळे जोरकस आहे.
स्थािनक स्वराज्य संस्थांना सुधारित करण्याची महत्त्वाची जबाबदारी आहे. त्याच महत्त्वाच्या कार्यावर या माध्यमातून भर दिला जाणार आहे. पंचायतच्या नियमित लोकशाही सभा, स्थायी समितीच्या कामकाजावर भर, स्वयंसेवी माहिती ग्रामसभा, एकाकडून दुसऱ्याकडे सोपवण्याच्या वृत्तीला प्रोत्साहन, पुरेसा तांत्रिक प्रशासकीय आधार पंचायतला प्रदान करण्याची कामे केली जाणार आहेत. राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान केंद्र पुरस्कृत योजना आहे. ग्रामसभा क्षमता आणी परिणामकारता यावर भर दिला जाणार आहे.
दृष्टिक्षेपातअभियान :आपले राष्ट्र हे कल्याणकारी राष्ट्र अाहे. समर्थ प्रशासन हा कल्याणकारी व्यवस्थेचा कणा आहे. समर्थ आणि सक्षम सुप्रशासनासाठी ग्रामीण क्षेत्रासाठी िवत्तीय पंचायतराज प्रणाली स्वीकारली आहे. सुप्रशासनाने अधिक सक्षम लोकािभमुख करण्यावर या अभियानाच्या माध्यमातून भर दिला जाणार आहे.

पंचायतराज प्रणाली सक्षम आणि लाेकाभिमुख करण्याचा प्रयत्न
जिल्हापरिषदेचा कणा असलेल्या कर्मचारी आणि अधिकारी या दोघांनी लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने ग्रामीण नागरिकांचे जीवन सुकर व्हावे, यासाठी योगदान देणे गरजेचे आहे. या अभियानाच्या माध्यमातून पंचायतराज व्यवस्था सक्षम आणि लोकािभमुख करण्यावर भर दिला जाणार आहे.'' जावेदइनामदार, उपमुख्यकार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन जि.प. अकोला