आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमण : सात दुकाने जमीनदोस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महानगरपालिकेच्या वतीने मंगळवारी रावण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत टिळक मार्गावर योगेश लॉटरी तर सावतराम चाळीतील मम्मी डॅडी कलेक्शन, जनता क्लॉथ सेंटर, सुपर जनता क्लॉथ स्टोअर्स, हरीश फॅशन, शेतकरी वस्त्र भांडार, एवन जनता क्लॉथ स्टोअर्स, प्रकाश हॅन्डलुम हाऊस, भारत क्लॉथ स्टोअर्स, न्यू जनता क्लॉथ स्टोअर्स, जय जनता क्लॉथ स्टोअर्स, चंदन साडीज, जय भारत फॅन्सी क्लॉथ स्टोअर्स, पेमुराम लखुमल, जयहिंद चौकात आर.के. कासार भांडी भांडार, गोपाल मेडिकल या व्यावसायिक प्रतिष्ठानांनी बाहेर केलेले अतिक्रमण तसेच पायर्‍या तोडण्यात आल्या आहेत. या मोहिमेत व्यावसायिकांचे अनेक अंगांनी नुकसान झाले आहे.
लोखंड विक्रेत्यावर दंड आकारणी करताना अधिकार्‍यांमध्ये एकमत नव्हते. 50 हजार रुपयांपासून दंड आकारणीची बोली झाली. ही बोली दोन लाख रुपयांवर गेली, परंतु अखेर एक लाख रुपये दंड घेण्याचा निर्णय झाला. संबंधित व्यावसायिकावर नेमका किती दंड आकारावा, यावर अधिकार्‍यांमध्ये एकमत न झाल्याने एक तास खर्च झाला, तर दंडाची आकारणी धनादेशाच्या माध्यमातूनही स्वीकारण्याचा निर्णय अधिकार्‍यांनी घेतला होता, हे विशेष.
सावतराम चाळ परिसरातील पांडे पाटील लॉजिस्टिक लिमिटेड, गोपी रोडलाइन्स, महाराष्ट्र रोडलाइन्स, महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट, मामा ट्रान्सपोर्ट, प्रतीक रोडलाइन्स या सात ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांची नझूलच्या जागेची लीजची मुदत संपुष्टात आली होती. लीजची मुदत वाढवून न घेतल्याचा फटका या व्यावसायिकांना बसला आणि गेल्या 50 वर्षांपासून असलेली ही सात दुकाने मंगळवारच्या मोहिमेत जमीनदोस्त झाली.
टिळक मार्गावर पुन्हा चालली मोहीम
जयहिंद चौक, किल्ला चौक, हरिहरपेठ या भागातही कारवाई
या मोहिमेत एक लाख 15 हजार रुपयांचा दंडही केला वसूल