आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Encroachment Campaign,latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दहा लाखांचा केला चुराडा, आठ दुकाने जमीनदोस्त, अतिक्रमणधारकांनी अडवल्या बसेस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- महापालिका अतिक्रमण पथकाने २५ सप्टेंबरला जुन्या बस स्थानक परिसरातील महामंडळाने लिजवर दिलेली आठ दुकाने जमिनदोस्त केली. विशेष म्हणजे यापैकी चार दुकाने महामंडळाने काही महिन्यांपूर्वीच प्रत्येकी अडीच लाख रुपये महसुल घेऊन संंबंधितांना दिली होती. त्यामुळे या मोहिमेमुळे दहा लाख रुपयाचा चुराडा झाला.
जुने बसस्थानकाची लीज संपली आहे. ही जागा मनपाने ताब्यात घेण्याचा प्रस्ताव महासभेत मंजुर केला आहे. महामंडळाने हे प्रकरण न्यायालयात नेले आहे. एसटी महामंडळाने बसस्थानक परिसरात दिलेली दुकाने काढण्याची सुचना महापािलकेने केली होती. परंतु या सुचने नंतरही ही दुकाने काढल्याने अतिक्रमण हटाव पथकाने माऊली झेरॉक्स, बेरोजगार मार्गदर्शन केंद्र, दिपाली पॉपकॉर्न, जय धनेश्वर जेन्टस् पार्लर, राजेश्वर रसवंती,शिवार्पण जनरल स्टोअर्स, जयभोले रेस्टारंट, गजानन वाचनालय ही आठ दुकाने जमिनदोस्त केली. दरम्यान, संतप्त झालेल्या अतिक्रमण धारकांनी संताप मंडळाच्या बसेसवर व्यक्त केला. बसेस अर्ध्या तास रोखुन धरल्या होत्या.
प्रत्येकाचेअडीच लाख गेले पाण्यात : माऊलीझेरॉक्स सेंटर हे बसस्थानका समोरील नझुलच्या जागेवर होते. महापालिकेने ५५ दुकाने जमिनदोस्त केली,त्यात माऊल झेरॉक्सही होते. माऊली झेरॉक्सच्या संचालकांनी काही दिवसांपूर्वीच महामंडळाकडे अडीच लाख रुपये महसुलाचा भरणा करुन बसस्थानक परिसरात जागा घेतली. अद्याप बुक केलेली मोठी झेरॉक्स मशिनही लावलेली नव्हती तर आज पुन्हा दुकान जमिनदोस्त झाले. हीच गत प्रा.रणजित इंगळे यांची झाली. त्यांनी बेरोजगार मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यासाठी जागा घेतली तर दिपाली पॉपकॉर्न, जय धनेश्वर जेन्टस पार्लर यांनीही अडीच लाखांचा भरणा करुन दुकाने ताब्यात घेतली होती. जुन्या बसस्थानक परिसरातील आठ दुकाने जमीनदोस्त करण्यात आली.