आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्ह्यात वनक्षेत्रावर वाढतेय अतिक्रमण; तिघांविरुद्ध भारतीय वन कायद्यानुसार गुन्हा दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - जिल्ह्यातील प्रादेशिकमध्ये समावेश असलेल्या वनक्षेत्रात काही काळापासून होत असलेले वाढते अतिक्रमण पाहता वनविभागाने याचा बीमोड करण्यासाठी आठ दिवसांपासून मोहीम राबवली आहे. या मोहिमेदरम्यान तिघांविरुद्ध भारतीय वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, 12 लाख रुपयांचे तीन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहेत.

ढालसावंगी, बुलडाण्यानजीकचे चांदमारी आणि ज्ञानगंगा अभयारण्यालगतच्या भागात असलेल्या बोरखेड बिटमध्ये कारवाई करून हे गुन्हे दाखल करण्यात आले. धाड परिसरात असलेल्या ढालसावंगी येथे वनविभागाच्या जागेवर ट्रॅक्टरद्वारे नांगरणी सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून वनविभागाच्या पथकाने ट्रॅक्टर ताब्यात घेऊन चालक अर्जुन कायंदे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर बुलडाणा शहरानजीकच्या चांदमारी खोºयातही वन जमिनीवर अनधिकृतरीत्या प्रवेश करून शेतीसाठी जमीन तयार करण्याचा प्रयत्न करणाºयाविरोधात कारवाई करून वनविभागाने ट्रॅक्टर जप्त केला. तिसरी कारवाई शनिवारी रात्री 2 वाजताच्या सुमारास ज्ञानगंगा अभयारण्यालगत असलेल्या बोरखेड शिवारात करण्यात आली. या कारवाईत तीन दिवसांपूर्वी विकत घेतलेल्या नव्या ट्रॅक्टरद्वारे तरोडा येथील संजय रामधन नाईक हा वन जमीन नष्ट करून शेतीयोग्य बनवत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी काही झाडांची तोड झाल्याचे वनविभागाच्या लक्षात आले. दरम्यान, 30 मे ते 22 जून या कालावधीत वनविभागाने ही अतिक्रमणविरोधी मोहीम राबवून कारवाई केली. यामध्ये 12 लाख रुपयांचे तीन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले.

जिल्हा उपवनसंरक्षक डी. डी. गुजेला, सहायक वनसंरक्षक पी. आर. पाटील, ए. आर. जावरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरीक्षेत्र अधिकारी ए. पी. सोळंकी, वनपाल पी. टी. कसले, पी. एन. बुटे, पी. आर. काकड, वनरक्षक शीला खरात, एस. के. घुगे, व्ही. जी. मुळे, ए. ए. गीते, एच. एन. गीते, एस. डी. नालिंदे, वनमजूर राऊत, चालक लहाने यांनी ही कारवाई केली.
गुन्हा सिद्ध झाल्यास दोन वर्षे शिक्षा
या प्रकरणांमध्ये ज्या कायद्यानुसार गुन्हे दाखल झाले आहेत, ते न्यायालयात सिद्ध झाल्यास दोषींना दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा व दहा हजार रुपये दंड होऊ शकतो. सोबतच प्रसंगी या दोन्हीही शिक्षा होऊ शकतात. दंड न भरल्यास शिक्षेत सहा महिने वाढ करण्याची तरतूद आहे.

साधनांचा पुरवठा करू नये
अशा प्रकरणांमध्ये अतिक्रमणधारकांना ट्रॅक्टरचालक तसेच एखादे काम करताना त्याची शहानिशा करूनच ते काम स्वीकारावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे. बोरखेड शिवारातील कारवाईत जप्त करण्यात आलेला ट्रॅक्टर नवीन असून, त्याचे पासिंगही झाले नाही. या पार्श्वभूमीवर आर्थिक मोबदल्यासाठी अशी कामे स्वीकारणाºयांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.