अकोला - अकोट फैलजठारपेठ भागातील दोन ठिकाणी सुरु असलेले अनधिकृत बांधकाम मंगळवारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हटवले आहे. बांधकामधारकांनी मंजूर नकाशापेक्षा जास्त बांधकाम केल्याचे आढळून आले.
स्थानिक जठारपेठ गुप्ते मार्गे येथील अनधिकृत बांधकामधारक कमल नयन अग्रवाल यांचे १० फुटाचे अनधिकृत बांधकाम काढण्यात आले. तसेच अकोटफैल येथील अनधिकृत बांधकामधारक रोशन मडाले यांच्या घराचे ५० स्केअर फुटाचे अनधिकृत बांधकाम काढण्यात आले आहे. ही कारवाई जी. एम. पांडे, राजेंद्र घनबहाद्दूर, संदीप गावंडे यांच्या मार्गदर्शनात अतिक्रमण अधिकारी विष्णू डोंगरे, प्रवीण मिश्रा, संजय थोरात, विनोद वानखडे, महेंद्र जसानी, मिलिंद वानखडे यांनी केली.