आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका अतिक्रमण विभागाने अकोटफैलातील अतिक्रमण हटवले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने सुरू असलेल्या मोहिमेंतर्गत बुधवार, १७ सप्टेंबर रोजी अकोटफैल भागातील अशोकनगर, डॉ. आंबेडकर चौक, साधना चौक, भाजी बाजार या ठिकाणी अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली.

मनपा अतिक्रमण पथकाद्वारे शहरात अकोटफैल, अकोट रोड, अशोकनगर, साधना चौकातून व्यावसायिकांचे अतिक्रमण, रस्त्यावरील नाल्यावरील अतिक्रमण काढण्यात आले. या भागातील अनधिकृत बांधकाम मनपाच्या जेसीबीच्या साहाय्याने पाडण्यात आले. अतिक्रमणधारकांनी पुन्हा अतिक्रमण करू नये, अतिक्रमण स्वत: काढून मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले. अकोटफैल इतर भागात पुन्हा अतिक्रमण आढळल्यास अतिक्रमणधारकांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

मनपा आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या आदेशान्वये मनपा उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्या मार्गदर्शनात मनपा उत्तर क्षेत्रीय अधिकारी जी. एम. पांडे, मनपा अतिक्रमण अधिकारी विष्णू डोंगरे, अतिक्रमण विभागाचे प्रवीण मिश्रा, नगररचना विभागाचे संदीप गावंडे, टापरे, बडोणे, संजय थोरात, विनोद वानखडे, महेंद्र जसानी, मिलिंद वानखडे, जेसीबीचालक बाबाराव शिरसाट, मधुकर कांबळे, योगेश माने यांनी कारवाई केली. अशोकनगर, डॉ. आंबेडकर चौक, साधना चौक, भाजी बाजार या भागातील अतिक्रमण काढण्यात आले.