आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- महापालिका अतिक्रमण विभागाने 11 जूनला जेल चौक ते अशोक वाटिका या मार्गावरील अतिक्रमण हटवले. लघू व्यावसायिकांनी पुन्हा अतिक्रमण करू नये, यासाठी अतिक्रमण विभागाने रस्त्याच्या कडेला नाल्या खोदल्या.
अतिक्रमण हटाव पथकाने जेल चौक ते अशोक वाटिका मार्गावरील अनधिकृत होर्डिंग्ज, फलक काढले, तर पानठेले, चहाच्या टपर्‍या हटवल्या. गेल्या काही दिवसांपासून थंड झालेली ही मोहीम आयुक्तांनी पुन्हा सुरू केली होती. परंतु, अनधिकृत बांधकाम पाडण्याची मोहीम सुरू झाल्याने 10 जूनला अतिक्रमण हटाव पथकाने ही मोहीम राबवली नाही. 12 जूनला अनधिकृत बांधकाम पाडण्याची मोहीम नसल्यास अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येईल.