आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

न्यायालयाच्या जागेवरील अतिक्रमणाचा सफाया

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - न्यायालयाच्या जागेवर 15 वर्षांपासून असलेल्या अतिक्रमणाचा शुक्रवारी सफाया करण्यात आला. अतिक्रमण काढताना पोलिस-वकील आणि अतिक्रमणधारक एकमेकांसमोर उभे ठाकले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी बळाचा वापर करत अतिक्रमणधारकांचा विरोध मोडीत काढला. त्यामुळे मनपा प्रशासनाने अतिक्रमण काढता आले.

महसूल अधिकारी, मनपा प्रशासन, पोलिस, अकोला बार असोसिएशनचे सदस्य आणि कोर्ट कमिश्नर यांनी शुक्रवारी अतिक्रमण काढण्यासाठी धाव घेतली. या ठिकाणी काही झोपड्या, पक्की घरे आणि हॉटेल आणि ट्रामा सेंटरचे कार्यालय होते. हे सर्व अतिक्रमण जेसीबीच्या साहाय्याने हटवण्यात आले. या वेळी बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अँड. संजय तळोकार, सचिव अँड. प्रशांत दांदळे, अँड. शंकर ढोले यांच्यासह अँड. गणेश पाठक, अँड. मुकुंद जालनेकर, अँड. राजेश देशमुख, अँड. युसूफ नौरंगाबादी यांच्यासह अतिक्रमण निर्मूलन अधिकारी होते.

जागा कमी पडत आहे
न्यायालयाची जागा परत मिळण्यासाठी अनेकदा अकोला ते दिल्ली असा संघर्ष करावा लागला. दिवसेंदिवस न्यायालयालाच जागा कमी पडत आहे. तसेच वकील आणि पक्षकारांच्या वाहनांसाठीही जागा उपलब्ध होत नव्हती. अँड. प्रकाश वखरे, अध्यक्ष, बार असो.

अयोग्य पद्धतीने ताब्यात
जागा ताब्यात घेण्याबाबत न्यायालयाने 5 ऑगस्टपर्यंत वेळ दिला होता. मी स्वत: जागेचा ताबा देण्यासाठी तयारी करीत होतो. मात्र, आज अयोग्य पद्धतीने जागा ताब्यात घेण्यात आली. तसेच पोट भाडेकरूंबाबत माहिती नाही. डॉ. जगन्नाथ ढोणे, म. फुले चॅरिटेबल ट्रस्ट

तुकाराम बिरकड यांची मित्रासाठी धावा-धाव
वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष तुकाराम बिडकर यांचे डॉ. जगन्नाथ ढोणे मित्र. दोघेही राष्ट्रवादी कॉँग्रेसचे खंदेसर्मथक. मात्र, काही दिवसांपूर्वी डॉ. ढोणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. असे असतानाही बिडकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.

माजी आमदार ढोणे-वकिलांमध्ये तूतू-मैमै
जेसीबी मशीन ट्रस्टचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. जगन्नाथ ढोणे यांनी अडवली. त्यांनी न्यायालयाच्या आदेशाची प्रत दाखवण्याची मागणी केली. या वेळी ज्येष्ठ विधिज्ज्ञ मोतिसिंह मोहता थेट जेसीबीवर चढत त्यांनी कारवाईसाठी आग्रह धरला.