आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रचंड बंदोबस्तात ‘ते’ अतिक्रमण हटवले, अलियार पहिलवानचे अतिक्रमण भुईसपाट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- पोलिसांच्याकडक बंदोबस्तामुळे शुक्रवारी फतेअली चौकातील काश्मीर लॉजनजीक असलेल्या वादग्रस्त वाहिदचे पान सेंटर आणि अलियार खान यांच्या कार्यालयावर महापालिकेचा गजराज चालला. या वेळी पोलिसांनी अतिरिक्त कुमक तैनात ठेवली होती. तर, उपायुक्तांना पोलिसांनी बंदोबस्त पुरवून, तुम्ही कारवाई करा, आम्ही पाठीशी आहो, असे म्हणून समर्थन दिले. हेच अतिक्रमण काढण्यासाठी गेलेले मनपाचे पथक २६ जून रोजी खाली हात आले होते. कारवाईमध्ये महापालिकेकडून भेदभाव केल्या जात आहे म्हणून, उलटसुलट चर्चा सुरू होत्या, त्या चर्चेला आता विराम मिळाला आहे.
२६ जूनच्या कारवाईनंतर वाहिद यांनी तात्पुरता स्थगनादेश मिळवला होता. मात्र, आज न्यायालयाने त्यांचा स्थगनादेश फेटाळला. याच दरम्यान संधी साधून उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी अतिक्रमणाची कारवाई सुरू केली. शुक्रवारी त्यांनी त्यासाठी िसटी कोतवाली पोलिसांना बंदोबस्त मािगतला. पोलिसांनी त्यांना तत्काळ बंदोबस्त उपलब्ध करून दिला. त्या जोरावर महापालिकेचा ताफा संध्याकाळी वाजताच्या सुमारास काश्मीर लॉजजवळ पोहोचला. या वेळी दयानंद चिंचोलीकर यांनी वाहिद यांचे पान सेंटर तोडण्याचे आदेश दिले. त्यानंतर महापालिकेच्या गजराजचा पंजा पान सेंटरवर आदळला. या वेळी तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. ही कारवाई झाल्यानंतर लगेच त्यांनी अलियार खान यांचे कार्यालय पाडण्याचे आदेश दिले. अलियार खान यांचे वातानुकूलित कार्यालय पाडल्यामुळे प्रचंड नारेबाजी करण्यात आली. नारेबाजी रोखत पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणली.