आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात क्रेझ ‘एन्लार्ज फोटो’ची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- लग्न समारंभ किंवा कोणत्याही कार्यक्रमाची आठवण ठेवण्यासाठी फोटो काढले जातात. सध्या बदलणार्‍या फॅशनप्रमाणे फोटोचा ट्रेंडदेखील बदलत आहे. अकोलेकरांमध्ये ‘एन्लार्ज फोटो’ची क्रेझ असलेली दिसून येत आहे. अल्बमप्रमाणेच विविध वस्तूंवर फोटो प्रिंट केले जात आहेत.
फोटोच्या जगतात डिजिटलायझेन झाल्यानंतर फोटोमध्ये नवनवीन ट्रेंड आले. फोटोचा नियमित आकार बदलून घराच्या भिंतीच्या आकाराचे फोटो प्रिंट होत आहेत. 16 बाय 20, 20 बाय 24, 20 बाय 30, 24 बाय 36, 30 बाय 40, 30 बाय 50, 30 बाय 60 या आकाराच्या फोटोला अधिक मागणी आहे. एक सिंगल फोटो प्रिंट करण्यासोबतच फोटो कोलाज करण्याचा कल वाढला आहे. फोटोप्रमाणेच अल्बमचे प्रकारदेखील बदलत चालले आहे. डिजिटल फोटो बुक हा ट्रेंड करिज्मा व माज्दा अल्बममुळे आला. लग्न समारंभात अल्बम तयार करताना डिजिटल फोटो बुकला प्राध्यान्य दिले जात आहे.
या बुकमध्ये कार्यक्रमातील फोटोंची कोलाजमुळे आकर्षक मांडणी करण्यात येते. त्यांची डिजिटल प्रिंट असल्याने ते हाताळण्यास सोयीचे असतात. सर्व फोटोशिवाय अल्बमचे फ्रन्ट आणि बॅक कव्हरवर विशेष भर दिला जातो. अल्बमच्या मुखपृष्ठावर सिल्व्हर, गोल्ड, कॉपर मेटल, अँम्बॉस, व्हेलवेट, रेक्झीनची विविध डिझाइन केले जातात. एखाद्या फोटो फ्रेमप्रमाणेच अल्बमचे मुखपृष्ठ तयार केले जाते. यात विविध कव्हरदेखील आले आहेत. हे कव्हर जवळपास एक ते दहा हजार रुपयांपर्यंत आहेत.