आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परसबाग- निसर्गाच्या जवळ जाण्याचा उत्तम मार्ग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शहरीकरणवाढले तसे आपण निसर्गापासून लांब जात आहोत. घराच्या बाल्कनीत, छोटाशा अंगणात भाजी, फुलझाडे लावून परसबाग तयार करता येते. परसबाग दिसायला लहान जरी असली, तरी त्याचे फायदे खूप आहेत. परसबाग निसर्गाच्या जवळ जाण्याचा उत्तम मार्ग आहे.
२४ ऑगस्ट हा जागतिक परसबाग दनि म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेने २०१४- १५ हे वर्ष कौटुंबिक परसबाग काम वर्ष म्हणून जाहीर केले आहे. लोकांचे पोषण होण्यासाठी कौटुंबिक शेतीवर भर द्यावा, असे युनोचे म्हणणे आहे. हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवत शहरातील विशाल हिमालय फाउंडेशन अंतर्गत ‘सृष्टी वैभव’ या संस्थेने ग्रामीण भागातील जवळपास ३५० घरी परसबाग फुलवले आहे.
परसबाग ही संकल्पना शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील लोकांनी मोठ्या प्रमाणात आत्मसात केली आहे. घरी लहानशा जागेत, कुंड्यांमध्ये भाज्या लावल्यामुळे सेंद्रीय भाज्या मिळतात. घरातील उरलेले अन्न, सांडपाणी हे भाज्यांसाठी चांगले खत आहे. अगदी घरात वापरणाऱ्या प्लािस्टच्या ट्रेमध्येसुद्धा आपण पालेभाजी लावू शकतो. अंगणात फारशी जागा नसली, तरी लहान, मोठ्या कुंड्यांमध्ये टमाटे, वांगे, गवार, मिरची लावता येते. तसेच लहान जागेत कारले, दोडके, दुधी भोपळा, लाल भोपळा याचे वेल लावता येतात. शिवाय मोठी कुंडी किंवा ट्रेमध्ये कोथिंबिर, मेथी, पालक लावता येते. परसबाग एक असले, तरी त्याचे फायदे अनेक आहेत. परसबागेच्या माध्यमातून मुलांना शेतीचा प्राथमिक पातळीवर अभ्यास करता येते. झाडाची वाढ कशी होते, त्याचे प्रात्यक्षिकातून ज्ञान त्यांना मिळते.
लोकांमध्ये जागरूकता होणे आवश्यक
शहरीभागात परसबागेबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे. प्रत्येकाने घरी परसबाग तयार केल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. त्याबाबत लोकांमध्ये जागरूकता होणे आवश्यक आहे.'' उदयवझे, संचालक,विशाल हीमालय फाउंडेशन