आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक घराला मिळेल आता युनिक नंबर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - आधारकार्ड दिल्यानंतर आता प्रत्येक घराला युनिक क्रमांक मिळणार आहे. केंद्र शासनाने ही नवीन माेहीम हाती घेतली असून, या मोहिमेंतर्गत घरे, बंगले, झोपड्या, हॉटेल्स, दुकान अादींची माेजणी दोन दिवसांत सुरू होणार आहे.

केंद्र शासनाचे नगरविकास मंत्रालय मुख्य निवडणूक आयोगाचा हा उपक्रम असून, या मोहिमेचा शुभारंभ नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथून करण्यात आला आहे. या मोहिमेत कुटंुबांचे सर्वेक्षण होणार आहे. तसेच प्रत्येक हॉटेल, दुकान, घर आदी मालमत्तांना युनिक क्रमांक देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात शहरी भागात म्हणजेच नगरपालिका, महानगरपालिका आणि त्यानंतर ग्रामीण भागातील प्रत्येक गाव, वाडी, वस्तीनिहाय सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या विशिष्ट फॉर्ममध्ये कुटंुबप्रमुखाचे आधार कार्ड, रेशन कार्ड, मोबाइल क्रमांक, मतदार ओळखपत्र क्रमांक, घराचा प्रकार, शिक्षण, नोकरी, व्यवसाय अादी माहिती घेतली जाणार आहे. ही सर्व माहिती नंतर केंद्र शासनाच्या नगरविकास मंत्रालयाकडे सोपवली जाणार आहे. ‘सेंट्रल कमर्शियल इंडस्ट्री ऑफ इंडिया’ या खासगी संस्थेला सर्वेक्षणाचे काम देण्यात आले आहे.
काय फायदा होईल?

नागरिकांनाआधार कार्ड दिल्यानंतर आता प्रत्येक घर मालमत्तेला युनिक क्रमांक मिळणार आहे, ज्याचा उपयोग जनगणना, निवडणूक, पोस्ट विभाग, कर आकारणी, वीज वितरण, पोलिस प्रशासन, कृषी विभाग, न्यायालय, रोजगार अादी २१ कारणांसाठी होणार आहे. संबंधित क्रमांकानुसार घराची ओळख पक्की होईल.

जिल्ह्याला मिळणार वेगळा क्रमांक
एरव्हीवाहनांची पासिंग क्रमांकासाठी बुलडाणा जिल्ह्यासाठी ‘एमएच-२९’ हा संकेतांक आहे. आता घरांच्या सर्वेक्षणासाठी जिल्ह्याला ‘एमएच-०..’ असा वेगळा संकेतांक असणार आहे. येत्या काही दिवसांत बुलडाणा जिल्ह्यामधील शहरी भागात सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोखंडी पाटी लावण्याची अट
सर्वेक्षणझाल्यानंतर एक लोखंडी पाटी देण्यात येईल. त्या पाटीवर घराचा युनिक क्रमांक असेल. ही पाटी प्रत्येक घराच्या दर्शनी भागावर लावण्याची अट शासनाने टाकली आहे. सर्वेक्षण करण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे आय कार्ड असेल. तसेच प्रतिघर २० रुपये फी आकारण्यात येणार आहे.