आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अकोल्यात पवन पाडिया यांचा भारतीय जनता पक्षात पुर्नप्रवेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- माजी ज्येष्ठ नगरसेवक पवन पाडिया यांचा आज भाजपमध्ये पुर्नप्रवेश झाला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी भारिप-बमसंचे माजी पदाधिकारी व व्यापारी प्रकाश आनंदानी, सामाजिक कार्यकर्त्या सोनल ठक्कर यांचेदेखील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी स्वागत केले. भाजपपासून दूर गेलो नव्हतो. पक्ष जे काम सांगेल ती जबाबदारी यशस्वी करू, असा विश्वास या वेळी त्यांनी व्यक्त केला. या वेळी भारिप-बमसंचे माजी पदाधिकारी प्रकाश आनंदानी यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्या सोनल ठक्कर यांचे या वेळी प्रदेशाध्यक्षांनी स्वागत केले. दरम्यान, भाजप पुनप्र्रवेशाबद्दल व स्वागताबद्दल मी अनभिज्ञ होते, असे सोनल ठक्कर यांनी सांगितले.