आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षाला दोन कोटींचा खर्च तरीही शहरात गळती कायम, जलवाहिनी दुरुस्ती कागदावरच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - शहरातील पाइपलाइन, हातपंप, सबर्मसिबलपंप यावर महापालिकेचा जलप्रदाय विभाग वर्षाला सुमारे दोन कोटी खर्च करत आहे. या खर्चानंतरही शहरातील पाइपलाइनचे लिकेज कायम आहे. जलप्रदाय विभाग केवळ कागदी घोडे नाचवण्यात व्यस्त आहे. या प्रकाराकडे मनपा आयुक्तांनी लक्ष देण्याची गरज आहे.

शहरातील 73 प्रभागांमध्ये 73 कत्रांटदार जलप्रदाय विभागांतर्गत कार्यरत आहेत. शहरातील पाच झोनमध्ये पाच अभियंत्यांचे नियंत्रण आहे. 28 हजार चौरस किलोमीटरमध्ये शहरात पाणीपुरवठय़ाची पाइपलाइन व्यापलेली आहे. महिन्याला 15 लाख तर वर्षाला दोन कोटी रुपये या पाइपलाइनच्या देखभाल दुरुस्तीवर खर्च करण्यात येत आहे. नागरिकांना पाणीपुरवठा मिळतो किंवा नाही. याकडे प्रशासनाचे लक्ष राहते. यावर फिटरचे नियंत्रण राहत आहे. यासोबतच अभियंता कनिष्ठ अभियंता, उपअभियंता, कार्यकारी अभियंता आणि शहर अभियंता यांचा वॉच राहतो. एवढा फौजफाटा महापालिकेचा आहे.


शहरात अल्प प्रमाणात लिकेज
शहरात अतिशय अल्प प्रमाणात लिकेज आहे. लिकेज झाल्यास तत्काळ संबंधित कत्रांटदारकडून दुरुस्त केल्या जाते. यावर जलप्रदाय विभागाचे पूर्ण लक्ष राहते.’’ नंदलाल मेर्शाम, कार्यकारी अभियंता, मनपा, अकोला.


0शहरात 2500 ते 3000 हजार हातपंप
0सबर्मसिबल पंप 700 ते 800
0जेट पंप 300 ते 500
0 150 वॉल ओपनर कार्यरत