आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकमंत्र्यांच्या घरासमोर उद्या धरणे, विना अनुदानित शाळांमधील शिक्षकांचे आंदोलन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- प्राथमिक माध्यमिक विनाअनुदानित शाळेतील शिक्षक गेल्या १५ वर्षांपासून विनावेतन काम करत आहेत. विनाअनुदानित पात्र शाळांची यादी घोषित होऊन त्यांची अनुदानाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, अमरावती विभागातील जवळपास दोनशे पात्र शाळांची यादी शासनाने अद्याप जाहीर केलेली नाही. याविरोधात मंगळवार, १२ मे रोजी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांच्या घरासमोर धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्राथमिक माध्यमिक शाळांची आर्थिक तरतूद करण्याची प्रक्रिया कधी पूर्ण होणार हा प्रश्न निर्माण झाला असून, विभागातील विनाअनुदानित शिक्षकांवर आत्महत्येची वेळ आली आहे. या मागणीसंदर्भात कृती समितीने वेळोवेळी निवेदने देऊन चर्चा केली आहे. या वेळी या शिक्षकांचे पालकत्व स्वीकारण्याचे जाहीर करण्यात आले होते. तसेच मुंबई येथे पालकमंत्री रणजित पाटील, आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार दत्तात्रय सावंत, कृती समितीचे पदाधिकारी यांच्यासमवेत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी एप्रिलला झालेल्या चर्चेत आठ दिवसांत पात्र शाळांची यादी लावण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र, एक महिना उलटूनही अद्यापपर्यंत कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे जोपर्यंत पात्र शाळांची यादी जाहीर होत नाही, तोपर्यंत अमरावती विभागातील सर्व विनाअनुदानित शाळेवरील शिक्षक कर्मचारी पालकमंत्री शिक्षक आमदार यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात संबंधित शिक्षक, कर्मचाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन विनाअनुदानित शाळा कृती समितीचे पुंडलिकराव रहाटे, एस. के. वाहुरवाघ, सुरेश सिरसाट, बाळकृष्ण गावंडे, दीपक मानकर, व्ही. एन. देशमुख, वैभव भेंडे, गुजर, पारडे, पठाण, गावंडे आदींनी केले आहे.
बातम्या आणखी आहेत...