आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हायवेलगत आढळली चार दिवसांची चिमुकली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती-अमरावतीवरून बडनेराकडे जाणार्‍या एक्स्प्रेस हायवेलगतच्या निर्जनस्थळी शालमध्ये गुंडाळालेली चार दिवसांची चिमुकली सोमवारी (दि. 28) रात्री आढळून आली आहे. माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांनी तिला तातडीने डफरीन रुग्णालयात दाखल केले. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, त्या मुलीची निर्दयी माता कोण, याचा पोलिस शोध घेत आहेत.
अमरावती-बडनेरा एक्स्प्रेस हायवेवर असलेल्या बंद पडलेल्या टोलनाक्याच्या बाजूला ही मुलगी शालमध्ये गुंडाळून ठेवली होती. शहरातील दत्तविहार कॉलनीमध्ये राहणारे श्याम दामोधर आडे (33) हे संकेत कॉलनीमार्गे घराकडे जात होते. त्या वेळी रस्त्याच्या कडेला लागून असलेल्या निर्मनुष्य परिसरातून त्यांना बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी पाहिले असता, त्या ठिकाणी बाळ होते. म्हणून ते घराच्या भागात गेले. त्यांनी आणखी चार ते पाच नागरिकांना बोलावून आणले आणि पाहणी केली. त्या वेळी ती लहान मुलगी असल्याचे नागरिकांना कळले. त्यामुळे पोलिसांना ही माहिती देण्यात आली आहे. माहिती मिळताच गाडगेनगर ठाण्याचे उपनिरीक्षक राहुल चव्हाण आणि उपनिरीक्षक पॉवेल बेले आपल्या पथकासह घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी बाळाला ताब्यात घेतले. या मुलीच्या अंगात कपडे, टोपी घातलेली असून तिला शॉलमध्ये गुंडाळून ठेवलेले होते. मुलगी जोरजोराने रडत होती. त्यामुळे पोलिसांनी त्या चिमुकलीला शहरातील जिल्हा स्त्री रुग्णालयात (डफरीन) दाखल केले. या वेळी उपस्थितीत डॉक्टरांनी तिची तपासणी केली. ती चार ते पाच दिवसांची असून तिची प्रकृती व्यवस्थित असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सूत्रांनी सांगितले. डफरीनमधील डॉक्टर चिमकुलीवर विशेष लक्ष ठेवून आहेत.