आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Extension Of Runway At Shivni Airport On Priority

अकोला विमानतळाच्‍या धावपट्टी विस्तार ऐरणीवर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- येथील शिवणी विमानतळाच्या धावपट्टी विस्ताराचा प्रश्‍न राज्य शासनाने गंभीरतेने घेतला आहे. या विस्ताराच्या आड येत असलेल्या पीडीकेव्हीच्या जागेची सामान्य प्रशासन राज्यमंत्री फौजिया खान यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कचेरीत अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन या मुद्यावर एकूण परिस्थितीचा आढावा घेतला.

पीडीकेव्हीच्या अखत्यारीतील शरद सरोवराची पाहणी राज्यमंत्री फौजिया खान यांनी केली. या वेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी, जिल्हाधिकरी अरुण शिंदे, विमानतळ प्राधिकरणचे शर्मा, एसडीओ सोहम वायाळ इत्यादी अधिकारी त्यांच्यासोबत होते. त्यांचा ताफा सकाळीच विमानतळ आणि शरद सरोवरावर दाखल झाला. धावपट्टी विस्तारामुळे शरद सरोवरचे नुकसान होऊ शकते काय, याची पाहणी त्यांनी केली. डॉ. दाणी यांनी ज्वारीचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते तसेच या जमिनीवर संशोधन करण्यात येत असल्याचे सांगितले. यावर पी. एस. मीना यांनी हे उत्तर योग्य नसल्याचे सांगून यावर तोडगा निघू शकतो, असे मत व्यक्त केले. शिवणी विमानतळ धावपट्टी विस्तारीकरणाचा वस्तुनिष्ठ अहवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापुढे ठेवला जाईल. त्यानंतर अंतिम निर्णयासाठी मंत्रालयात बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.