आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघाताचा केला बनाव; आरोपी पोलिस कोठडीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - खैर मोहम्मद प्लॉट परिसरातील महिलेच्या खून प्रकरणातील आरोपी पतीची 9 सप्टेंबरला पोलिस कोठडीत रवानगी केली. याप्रकरणी जुने शहर पोलिसांनी तपासाअंती 8 सप्टेंबरला गुन्हा दाखल केला. रेश्मा बानो मोहम्मद तौसिफ (30) असे मृतक महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती मोहम्मद तौसिफ मोहम्मद हारूण (35) याला अटक केली. आरोपी तौसिफ हा चॉकलेटचा व्यावसायिक आहे. विजेचा धक्का लागल्याचे सांगत रेश्मा यांना 31 ऑगस्ट 2013 ला रुग्णालयात भरती केले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली. शवविच्छेदन अहवाल आणि प्राथमिक तपासाअंती पोलिसांनी भादंविचे कलम 302 (खून), 201 (पुरावा नष्ट करणे) अन्वये गुन्हा दाखल केला. दरम्यान, पोलिसांनी आरोपी तौसिफला प्रथर्मशेणी न्यायदंडाधिकारी हुसेन यांच्या न्यायालयात हजर केले. तपास अधिकारी एपीआय अनिल कुरुळकर यांनी घटनाक्रम सांगितला. न्यायालयाने आरोपीची 11 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले. सरकारकडून अँड. पंकज महल्ले यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.

खोलीत ठेवले कोंडून
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खुनानंतर रेश्माचा मृतदेह एका खोलीत काही वेळ डांबून ठेवण्यात आला. तिच्या खुनाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला.

माहेरची मंडळी येणार
पोलिसांतर्फे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती रेश्माच्या खामगाव येथील माहेरच्या मंडळींना देण्यात आली आहे. उद्या मोहरची मंडळी अकोल्यात येणार आहे.

क्रूरतेची परिसीमा
रेश्मा यांच्या छाती, शरीरावर भाजल्याच्या खुणा होत्या. त्या इलेक्ट्रिक प्रेसच्या होत्या. त्यांच्या डोक्याला मागील बाजूने जबर जखम शवविच्छेदनात आढळली. विजेचा धक्का लागून मृत्यू होऊ शकतो. मात्र, इलेक्ट्रिक प्रेसच्या चटक्याने मृत्यू कसा होऊ शकतो, असा प्रश्न पोलिसांना पडला. त्यामुळे पोलिसांनी तपास सुरू केला. रेश्माचे पती तौसिफची चौकशी केली. प्राथमिक तपास, शवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.