आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोतया आयएएस निघाला कंगाल; जामीनदाराअभावी नऊ महिन्यांपासून कारागृहात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - मुंबई, पुणे, अकोला येथे अनेकांना गंडविणारा तोतया आएएस अधिकारी आर्थिकदृष्ट्या ‘कमकुवत’ असल्याची बाब उजेडात आली आहे. त्याच्याकडे स्वत:चा वकील ठेवण्यासाठीही पैसे नाहीत. त्यामुळे त्याची बाजू न्यायालयात मांडण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणाने अँड. केशव एच. गिरी यांची नेमणूक केली आहे. पुरुषोत्तम गजानन तायडे (रा. शेगाव) हे या तोतया आयएएस अधिकार्‍याचे नाव आहे. घटनेपासून तो कारागृहात असून, जामीन मिळण्यासाठी जामीनदाराचा शोध घेण्यात येत आहे. आरोपी तायडेविरुद्ध रामदासपेठ पोलिस ठाण्यात 17 डिसेंबर 2012 रोजी रामदास भादंविचे कलम 468, (बनावट दस्तावेज तयार करणे) 471 (बनावट दस्तावेज खरा म्हणून वापरणे), 472 (बनावट मोहोर तयार करणे), 419 (तोतयेगिरी करणे) गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई शहर पोलिस उपअधीक्षक अमरसिंह जाधव यांच्या अँटी गुंडास्क्वॉडने केली होती.

तसेच शासनाच्या योजनेंतर्गत तुमच्या क्लासची सर्वच शासकीय कर्मचार्‍यांची संगणक शिकवण्यासाठी निवड झाली आहे, असेही त्याने सांगितले. यासाठी 75 लाख रुपये तुमच्या खात्यात जमा करतो, असेही तो बडबडला. यासाठी त्याने पैशांचीही मागणी केली होती. मात्र क्लासच्या संचालकांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. त्यामुळे या तोतयेगिरीचा पर्दाफाश झाला होता.

प्राध्यापकांनाही गंडवले
तोतया पुरुषोत्तम तायडेने मुंबई, पुणे येथेही अनेकांना गंडवले असून, यामध्ये प्राध्यापकांचाही समावेश आहे. मात्र फसवणूक झालेल्यांनी कारवाईसाठी फारसा पाठपुरावा केला नाही.

दृष्टिक्षेप घटनेवर..
आरोपी पुरुषोत्तम तायडे हा जठारपेठेतील एका कोचिंग क्लासमध्ये गेला. त्याने आपण आयएएस अधिकारी असल्याची बतावणी केली. मी या जिल्ह्याचा ब्रॅँड अँम्बेसिडर असून, जिल्हाधिकारी म्हणून रुजू होणार आहे, असेही क्लासच्या संचालकांना सांगितले. त्याने तसे राष्ट्रपती कार्यालयाकडून नियुक्ती केलेले पत्रही दाखवले