आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॅलो, आम्हाला सोने सापडले! अर्ध्या किमतीत ते विकायचंय, घेणार का?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - ‘हॅलो..मी असलम बोलतोय. ट्रकचालक आहे. माझ्या भावाला खोदकामात सोनं सापडलंय. अर्ध्या किमतीत ते विकायचंय. घेणार का?’ असा जर अनोळखी क्रमांकावरून तुम्हाला कॉल आला तर सावध राहा. गुप्तधनाच्या नावाखाली शहरात बनावट सोने विकणारी टोळी सक्रिय झाली आहे.

दिल्ली, मुंबई, कोलकाता या ठिकाणावरून बोलतो, असे सांगून अत्यंत मधाळ संभाषण करून या टोळीचे सदस्य फोनवरूनच जाळ्यात ओढतात. पहिल्यांदा आपल्याला दिल्ली, मुंबई किंवा अन्य ठिकाणी येण्याचे सांगतात. आपण त्या ठिकाणी येऊ शकत नाही, असे सांगितले तर दिवसभरात आठ ते दहा कॉल करून सोने घेण्यासाठी अनेक ग्राहक तयार आहेत. मात्र, त्यांना आपल्याला सोने विकायचे नाही, ते याबाबत बोभाटा करतील, असे सांगून तुम्हीच सोने खरेदी करा, अशी गळ घालतात. शेवटी दोन ते तीन दिवसांनंतर आपण नागपूर किंवा अमरावती येथे आल्याचे सांगून त्या ठिकाणी भेटायला बोलावतात. आपण त्या ठिकाणीही भेटायला गेलाे नाही तर पुन्हा वारंवार कॉल करून अकोला येथे आलो एक वेळ भेटून तर जा, असे सांगतात. एक वेळ त्यांची भेट घेतली की आपोआप भेट घेणारा त्यांच्या जाळ्यात ओढला जातो आणि आर्थिक फसवणूक होते.

फसवणूकझालेले देत नाहीत तक्रार : गुप्तधनकिंवा चोरीतील सोने खरेदी करणे हाही गुन्हा असल्याने अशा प्रकारांमध्ये फसवणूक झालेल्या अनेक व्यक्ती तक्रार देत नाहीत. पोलिस आपल्यालाच दोषी ठरवतील, अशी त्यांना भीती असते. त्यामुळे पोलिसांनी जागृती करणे आवश्यक आहे.

तक्रार द्या
असा कॉल आल्यास सावध व्हा. पोलिस ठाण्यात माहिती द्या. सापळा रचून कारवाई केली जाईल. यासाठी पोलिस मदत करतील.'' चंद्रकिशोर मीणा, जिल्हा पोलिस अधीक्षक.

या क्रमांकांवरून येऊ शकतो कॉल
७०२७६७४५४२,८३९६८६२५३०

अशी ही फसवा-फसवी
अत्यंतविनवणीच्या स्वरात सोने विकत घ्या, अशी गळ ते घालतात. शिवाय सुरुवातीला व्हॉट्सअॅपवर सोन्याच्या विटांचा फोटोसुद्धा पाठवतात. त्यांची भेट घेतल्यावर त्या विटांमधल्याच एका विटेचा तुकडा आपल्या हाती देतात, सराफा बाजारात जाऊन त्याची तपासणी करा, असे सांगतात. सोबत त्यांचा माणूस येतो. तो तुकडा खरा असतो किंवा त्यावर सोन्याचा मुलामा दिलेला असतो. त्यामुळे ग्राहकांचा त्यावर चटकन विश्वास बसतो. परिणामी, त्यांच्याकडे असलेल्या बनावट एक ते दीड किलो पिवळ्या धातूला आपण खरेच सोने समजून विकत घेतो.

अनेकांना लाखोंनी गंडवले
अमरावतीजिल्ह्यातील राजुरा जंगलामध्ये १६ मार्च २०१५ ला मालेगाव पोलिसांनी संदीप पवार (२५, बैतुल) आणि राजेंद्र पवार (३८, रा. उमठा, नागपूर) या दोघांना अशाच प्रकारे फसवणूक केल्याच्या आरोपाखाली पकडले होते. त्यांनी मालेगाव येथील एका व्यक्तीची चार लाखाने फसवणूक केली होती. तसेच जून २०१२ मध्ये वायफड (जि. वर्धा) या ठिकाणीसुद्धा पोलिसांनी चौघांना अटक केली होती.