आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fake Note News In Marathi, Court, Police, Divya Marathi

बनावट नोटाप्रकरणी आणखी एक आरोपी गजाआड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - बनावट नोटा प्रकरणातील प्रमुख आरोपी दीपक पवार पोलिस कोठडीत आहे. त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री 12 वाजताच्या दरम्यान पोलिसांनी देगाव येथून आणखी एका आरोपीस अटक केली आहे. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 29 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 27 फेब्रुवारी रोजी दीपक पवार याच्या घरातून लाखो रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी छापा टाकून जप्त केल्या होत्या. बनावट नोटा प्रकरणात पोलिसांनी आजपर्यंत पाच आरोपींना अटक केली आहे.

शनिवारी या प्रकरणातील मुख्य आरोपी दीपक पवार याला पोलिसांनी अटक केली होती. तो सध्या पोलिस कोठडीत आहे.या प्रकरणात उपविभागीय पोलिस अधिकारी अमरसिंग जाधव यांच्या नेतृत्वात नितीन रेवस्कर, विलास बंकावर, अब्दुल फहिम, सुनील चावके, महेंद्र घनबहाद्दूर, हरणे यांनी सापळा रचून या गोरखधंद्यात सहभाग असणार्‍या शिवाजी उर्फ छगन गणपतराव भुतेकर (28) याला रिसोड तालुक्यातील देगाव येथून सोमवारी मध्यरात्री ताब्यात घेतले. शिवाजी भुतेकर हा बनावट नोटा चलनात आणण्यासाठी दीपक पवारला मदत करत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. भुतेकर याच्या अटकेने आता बनावट नोटांचे अनेक गुपिते समोर येणार आहेत. यापूर्वी मनोज पवार आणि सूरज गोयर या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.