आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भातील नृत्य कलावंतांना हवी दिशा, प्रसिद्ध कोरिओग्राफर अंकन सेनचे प्रतिपादन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मी अकोल्यासारख्या ठिकाणी प्रथमच आलो आहे. अकोल्यातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड कलागुण आहेत. मात्र, त्यांना योग्य दिशा मार्गदर्शनाची गरज आहे. अवघ्या काही दिवसांमध्ये ही मुले खूप चांगले नृत्य शिकतात, याचा मला आनंद आहे, असे मत प्रसिद्ध कोरिओग्राफर अंकन सेन यांनी येथे व्यक्त केले.
स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या वतीने उन्हाळी सुट्यांमध्ये विद्यार्थ्यांना नृत्य प्रशिक्षण देण्यासाठी आयोजित शिबिरासाठी ते अकोल्यात आले असता पत्रकारांशी आज, मे रोजी बोलत होते. अंकन सेन आपल्या प्रवासाविषयी सांगताना म्हणाले की, वयाच्या नवव्या वर्षी नृत्यासाठी आपले घर सोडले. माझ्या घरात नृत्याला थारा नव्हता म्हणून घरातून पळ काढत जमेल तेथे नृत्य शिकण्याचा प्रयत्न केला. अनेक संकटांवर मात करून नृत्य शिकल्यानंतर आज कुठे यश मिळवले.
‘जस्ट डान्स’ या रिअॅलिटी शोमध्ये मी खूप संघर्षानंतर विजेता ठरलो. या कार्यक्रमाचे परीक्षक चित्रपट अभिनेते हृतिक रोशन, फराह खान, वैभव मर्चंट होते. मी जिंकल्यानंतर हृतिक रोशन यांनी माझ्या पालकांना स्टेजवर बोलावून ‘हा मुलगा केवळ नृत्यच करेल’ असे सांगितले, त्या वेळी मला खऱ्या अर्थाने जिंकल्यासारखे वाटले. त्यानंतर मी अनेक चित्रपटांमधून कोरिओग्राफी करतो आहे. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या यारिया चित्रपटातील ‘आज दिल हैं पाणी पाणी...’ गाण्याची कोरिओग्राफी मी केली होती. एवढेच नव्हे, तर ‘दिल जम्पिंग झपांग’ची कोरिओग्राफी मीच केली आहे.
मात्र, पडद्यावर दिसणारे चेहरे लोकांच्या लक्षात राहतात, पडद्यामागे अनेक कलावंत आपली कला फुलवत असतात. विशेष म्हणजे मला शाहरुख खानला महिने नृत्य शिकवण्याची संधी मिळाली. मी हृतिक रोशनसोबत सहायक म्हणूनही काम पाहिले आहे. मला २०१२ मध्ये बिग डान्सर एन्टरटेनमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. अकोल्यात नृत्य प्रशिक्षण शिबिराच्या निमित्ताने मी आलो. मला इथल्या मुलांमध्ये नृत्याची भूक दिसून आली, मात्र त्यांना योग्य मार्गदर्शन उपलब्ध नसल्याचे जाणवले. अवघ्या काही दिवसांमध्ये त्यांनी खूप चांगले प्रदर्शन केले आहे.मी त्यांना हिपहॉप, राजस्थानी फोक, ओल्ड स्कूल हिपहॉप, फंक बॉलीवूड, कंटेम्पररी, पाॅपिंग, टटिंग आदी शिकवण्याचा प्रयत्न केला आहे.

स्कूल ऑफ स्कॉलर्सचा मे रोजी ग्रँडफिनाले
स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये मुख्याध्यापक सुरेश लकडे यांच्या मार्गदर्शनात २० एप्रिल ते मेदरम्यान बिट्स अँड टोज् संस्था, नागपूरचे आयोजक कुणाल बोरकर यांच्या वतीने मुंबईचे कोरिओग्राफर अंकन सेन त्यांची चमू हितेन तायडे, शान सिंग, स्वप्निल तायडे यांच्या कार्यशाळेचे आयोजन झाले. कार्यशाळेचे उद््घाटन उपमुख्याध्यापिका मुक्ता पिल्ले यांनी केले. कार्यशाळेत १६० विद्यार्थी १०० शिक्षक, शिक्षिकांनी भाग घेतला.
नृत्य शिबिरात घेतलेल्या धड्यांचे प्रत्यक्ष सादरीकरण मे रोजी कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात ग्रँडफिनालेच्या रूपाने सादर होणार आहे. तसेच स्वत: अंकन सेन त्यांची चमू नृत्याचे सादरीकरण करणार आहेत. तरी या पर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यकारी अधिकारी राजेश कड यांनी केले आहे.