आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Farmar Tray To Suicide On Electricity Officer Car

अधिकाऱ्यांच्या गाडीसमोर शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - थकितवीज बिल मागण्यासाठी आलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या वाहनासमोर झोपून तालुक्यातील कट्यार येथील शेतकऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना १८ डिसेंबर रोजी दुपारी १.३० वाजता घडली. साहेब, आधीच दुष्काळ पडेल हाये, त्यात वीजेच्या बिलाचे पैसे कोठून भरू, अशी भावनिक साद शेतकऱ्याने अधिकाऱ्यांना घातली.

महावितरणचे वरिष्ठ अधिकारी ६.३० वाजता आले तेव्हा शेतकऱ्याने आंदोलन मागे घेतले. शासनाने शेतकऱ्यांना वीज बिल माफीची घोषणा केली असतानासुद्धा महावितरणचे वसुली पथकातील कनिष्ठ अभियंता आर. एम. देवसी, एफ. झेड. फाटा लेखापाल ए. व्ही. मुळे हे तीन अधिकारी कट्यार येथे पोहोचले. तीनही अधिकाऱ्यांनी शेतकरी गजानन रुपराव देशमुख यांना थकित वीज बिल भरण्याची मागणी केली. तेव्हा पैसे नसल्याचे कारण सांगूनही त्यांना पैसे भरावेच लागतील, असा तगादा लावला. त्यामुळे या शेतकऱ्याने वीजपुरवठा करू नका, अशा िवनवण्या केल्या. मात्र, पथकातील अधिकाऱ्यांनी काही एक ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यामुळे या शेतकऱ्याने वाहनासमोर उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेने गावातील नागरिक मोठ्या संख्येने संतप्त झाले होते.

वरिष्ठअधिकाऱ्यांची भेट
महावितरणचेसहायक अभियंता जयंत पैकीने गजानन जानोरकर यांनी कट्यार येथे भेट देऊन प्रकरण निवळले. शेतकऱ्याचे त्यांनी सांत्वन केले. महावितरणचे वरिष्ठ अधिकारी सायंकाळी ६.३० वाजता आले, त्यानंतर शेतकऱ्याने आपले आंदोलन मागे घेतले.

महावितरण उठले शेतकऱ्यांच्या जीवावर
-मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतरही जर महावितरणचे अधिकारी असे गावात येऊन शेतकऱ्यांना धमकावत असतील, तर गरीब शेतकऱ्यांनी कोणाकडे न्याय मागायचा, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. यावरून शेतकरी महावितरणच्या जीवावर उठले असल्याचे दिसून येते.'' रामसिंगसोळंके, शेतकरी,कट्यार.

कृषिपंप मिळेना
-सहामहिन्यांपासून महावितरणकडे कृषिपंपासाठी अर्ज केला आहे. अद्याप सर्व्हे बाकी आहे. त्यामुळे अद्याप वीज कनेक्शन मिळू शकले नाही.'' ज्योतीदेशमुख, शेतकरी

वसुलीसाठी गेलो होतो
-कट्यारयेथे आम्ही वसुलीसाठी गेलो होतो. कुणाला त्रास व्हावा, हा आमचा उद्देश नव्हता. वरिष्ठ अधिकारी पैकीने आल्यानंतर प्रकरण निवळले.'' एफ.झेड. पाटा, कनिष्ठअभियंता

महावितरण अधिकाऱ्यांच्या वाहनासमोर आत्महत्येचा प्रयत्न करणारा कट्यार येथील शेतकरी. त्याकडे पाहणाऱ्यांचेही प्रश्नार्थकच भाव होते.