आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज पडून शेतकर्‍याचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- पावसाळ्यात आकाशात विजा कडाडण्याचे प्रमाण जास्त असते. पण, सध्या उन्हाळ्यातदेखील अवकाळी पाऊस, वादळी वार्‍याने थैमान घातले आहे. वीज जमिनीवर पडून माणसांचा मृत्यू झाल्याच्या घटनादेखील घडल्या. आकाशात कडाडणार्‍या विजेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, त्यापासून संरक्षण करण्यासाठी काळजी घेतली पाहिजे.
पाण्याचे बाष्पीभवन झाल्यामुळे आकाशात ढग तयार होतात. यापैकी काही ढग धन विद्युतने, तर काही ढग ऋण विद्युतने भारित होतात. म्हणजेच, त्यांच्यावर पॉझिटिव्ह व निगेटिव्ह इलेक्ट्रिसिटी असते. विज्ञानानुसार धन व ऋण विद्युत एकमेकांना आकर्षित करतात. त्याच नियमाप्रमाणेच धन व ऋण विद्युत भारीत ढग एकमेकांकडे आकर्षित झाल्यानंतर त्यांच्यात जे घर्षण होते, त्यातून प्रचंड अशी ऊर्जा निर्माण होते. ही ऊर्जा प्रकाश व ध्वनी या माध्यमातून प्रकट होते. प्रकाशाचा वेग ध्वनीपेक्षा जास्त असल्याने आकाशात विजेचे चकाकणे प्रथम दिसते व नंतर कडकडाट ऐकू येतो. ऊज्रेला आकर्षित करण्याचा जमिनीचा गुणधर्म असल्याने ही वीज जमिनीवर पडते. त्याचप्रमाणे झाडांकडेदेखील आकर्षित होत असल्याने पावसापासून बचाव करण्यासाठी झाडांच्या आर्शयाला थांबलेल्या व्यक्तींना इजा पोहोचवते.
विजा कडाडत असताना शेतात काम करत असल्यास झाडाखाली उभे राहणे टाळावे. त्याऐवजी जमिनीवर आडवे झोपल्यास वीज आपल्याकडे आकर्षित होणार नाही आणि आपला बचावदेखील होईल, अशी माहिती आरएलटी विज्ञान महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागप्रमुख प्रा. एम. एस. तापी यांनी दिली. .
घरावरील टिनपत्रे उडाली
फेब्रुवारी आणि मार्चमध्ये झालेल्या गारपिटीची घटना ताजी असताना शनिवारी सकाळीच वादळी वार्‍यासह पाऊस आल्याने लोणाग्रा परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले होते. विजांच्या प्रचंड कडकडाटाने हृदयाचे ठोके चुकवले. सकाळी 7 वाजताच्या सुमारास आलेल्या वादळाने अनेक घरांवरील टिनपत्रे उडाली, तर अनेक झाडे उन्मळून पडली. अकोला आणि बाळापूर तालुक्यातील बहुतांश ठिकाणी वादळी पाऊस झाला.