आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लागवडीचे साहित्य कृषी विभागात धूळ खात पडून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मूर्तिजापूर- शासनस्तरावरून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवण्यात येतात. काही कर्तव्यदक्ष अधिकारी या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतात. मात्र, शेतकऱ्यांनीच आर्थिक कारणामुळे या योजनांकडे पाठ फिरवल्याने येथील कृषी विभागात आलेले पेरणी यंत्र, फवारणी यंत्र, स्प्रेअर पंप आदी साहित्य धूळ खात पडून असल्याने अधिकारी खंत व्यक्त करत आहेत.
अल्पभूधारक शेतकऱ्यांकरिता शेतीसंबंधित विविध साहित्य, अवजारे वाटपाचे काम विविध योजनांमधून करण्यात येते. यासंदर्भात अधिकारी, कृषी सहायक हे गावनिहाय निवड केलेले कृषिमित्र गावनिहाय बैठक घेऊन या योजनांची माहिती शेतकऱ्यांना देतात. सर्वच योजनांमध्ये सबसिडी मिळत असून, लोकवाटा भरल्यास साहित्य शेतकऱ्यांना वाटप करण्यात येते. मात्र, हा लोकवाटा शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने विविध योजनेचे वेगवेगळे साहित्य कृषी विभागात पडून आहेत. तालुक्याच्या तुलनेत ५० नग, साहित्य, तर काही योजनांचे केवळ सहा नग असूनदेखील लाेकवाट्याअभावी ते धूळ खात आहेत.
त्यामुळे लोकवाटा भरून साहित्य घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा येथील कृषी विभागाला लागली अाहे. कृषी साहित्य खरेदी करण्यासाठी येणाऱ्या आर्थिक अडचणींसोबतच काही योजनांच्या अटीदेखील शेतकऱ्यांसाठी जाचक ठरत आहेत. परिणामी, सततच्या नापिकीमुळे अल्पभूधारक शेतकरी लोकवाटा भरण्यासाठी पैसा आणणार तरी कोठून, तर कृषी विभाग आणखी किती दिवस शेतकऱ्यांची प्रतीक्षा करेल, हे एक कोडे बनले आहे. गेल्या वर्षीच्या खरीप रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या हाती फारसे काही लागले नाही. कर्जाचेही पुनर्गठन झाले नाही. बँकाही कर्ज देण्यास टाळत असल्यामुळे शासनानेच काही उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या या योजनांचा लाभ धेण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे केवळ ७/१२ एक अर्ज देण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर योजनानिहाय साहित्यांच्या खरेदीसाठी निश्चित केलेला लोकवाटा भरून साहित्य घेता येते. या योजनेसाठी कुठलेही काम रेंगाळत नसल्याचे सांगण्यात आले.
कृषी विभागाशी थेट संपर्क साधावा
- कृषी विभागांतर्गत गावनिहाय सभेत विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली जाते. मात्र, लाेकवाटा सर्व योजनांमध्ये अनिवार्य असल्याने शेतकरी तो भरू शकत नाहीत. त्यामुळे विविध योजनेतील शेतीविषयी साहित्य पडून राहते. शेतकऱ्यांपर्यंत योजनांची माहिती पोहोचवण्यात कृषी विभागाकडून कुठलीही कसूर होत नाही. योजनेची माहितीसंदर्भात शेतकऱ्यांनी थेट कृषी विभागात संपर्क साधावा. योजनेबसंदर्भात येणाऱ्या चुकीच्या वृत्तांकडे लक्ष देऊ नये. ''
प्रफुल्ल सातव, तालुकाकृषी अधिकारी.
अशा आहेत योजना
- राष्ट्रीय गळीत धान्य तेलताड अभियान
होंडा कंपनीचे पॉवर स्प्रेअर
- नग 6, वाटप 2, शिल्लक 4, किंमत १८३८६, लोकवाटा ८३८६, सबसिडी १००००.
- राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान
फवारणीयंत्र
- नग १४००, वाटप ३००, शिल्लक ११००, किंमत १२६६, लोकवाटा ६६६, सबसिडी ६००.

- राष्ट्रीय गळीत धान्य तेलताड अभियान
रूंदसरीवरंबा पद्धतीचे पेरणी यंत्र
- नग ४७, वाटप १६, शिल्लक ३१, किंमत ४८३४८, लोकवाटा ४४०००, आरक्षितसाठी ३५०००
- राष्ट्रीय फलोत्पादन अभियान
स्प्रेपंप
- नग ११, वाटप5 , शिल्लक 6, किंमत ४२१९, लोकवाटा २१०९, सबसिडी २१०९.
- राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान
धरती अॅग्रो कंपनीचे पेरणी यंत्र
- नग 8, वाटप 2, शिल्लक 6, किंमत ५२४४२, लोकवाटा ३७४४२, सबसिडी १५०००.
बातम्या आणखी आहेत...