आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात शेतकर्‍याने घेतले विष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - नुकसानीचा मदतनिधी देण्यालाठी तलाठी चिरीमिरी मागत होता. तलाठ्याची तक्रार करण्यासाठी जिल्हाधिकार्याचा उंबरठा गाठला. पण त्यांनीही भेट नाकारली. हताश शेतकरी बाहेर आला, अन् पुढ्यात तोच तलाठी हजर. पुन्हा आर्जव करुनही त्याने दाद दिली नाही.

त्यामुळे शेतकर्‍याने विषाची बाटली घशाखाली ओतली. ही घटना अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात शुक्रवारी घडली. गजानन संपत भांबरे (५०) असे या शेतकर्‍याचे नाव आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. नेरधामणा येथील भांबरे यांच्याकडे आठ एकर शेत जमीन आहे. त्यांना एक मुलगा आणि तीन मुली आहेत. वर्ष २०१३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे यांच्या शेतीपिकाचे नुकसान झाले. शासनाने सर्वेक्षण करून भांबरे यांना तीन हजार रुपये मदत जाहीर केली. भांबरे आवश्यक ती कागदपत्रे देण्यासाठी तलाठी एम. एन. मांजरे पैशाची मागणी करत होते. त्यामुळे रुपये मिळाले नाहीत.
बातम्या आणखी आहेत...