आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढतोच आहे आत्महत्येचा आकडा, सर्वच समुपदेशन समित्या केवळ कागदावरच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली की, लोकप्रतिनिधी तहसीलचे अधिकारी सांत्वन करायला येतात. शेतकरी आत्महत्या प्रकरण तयार करायलासुद्धा अनेक कागदपत्रांची जुळवाजुळव करायला लागते. त्यातील अटी िशथिल कराव्यात.'' {श्रीकृष्ण ठोंबरे,शेतकरी,कान्हेरी.

तालुक्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्या साठी समुपदेशन जनजागृती समिती कार्यान्वित असते याची कल्पना आहे. पण, याबाबतचे पत्र १५डिसेंबर रोजीच जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाले.'' {मधुकर मुरकुटे,गटविकासअधिकारी, पातूर
शेतकरी आत्महत्यानिवारणार्थ असलेल्या समुपदेशन समितीबाबतचे आजच पत्र मिळाले. जिल्हािधकाऱ्यांच्या सूचनेनुसार निश्चित कार्यवाही करण्यात येऊन समितीची बैठक घेऊ.'' {डी. एस.बचुटे, गटविकासअधिकारी, अकोला
जनजागृती नाही
जिल्ह्यातीलएकाही गावात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारची जनजागृती करण्यात आली नाही. जनजागृतीचे फलक लावण्यात आले नाही. जनजागृतीच होत नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या हा गंभीर प्रश्न बनला आहे. शेतकऱ्याला प्रेरीत करण्यासाठी या समिती आतापर्यंत कोणताही चांगला उपक्रमही हातात घेतला नही. त्यामुळे या समित्यांची निर्मिती करुन कोणताही फायदा झाला नाही.