आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विष प्राशन करुन शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- शेतात सोयाबीन पेरले. मात्र, उत्पन्न काहीच झाले नाही. जवळ होतानव्हता पैसा शेतीत लावला. आता मुलाच्या शिक्षणासाठी आणि खाण्यापिण्यासाठी काहीच पैसा नाही. त्यामुळे नागझरी येथील शेतकऱ्याने विष प्राशन केले. गंभीर अवस्थेत त्यास अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात भरती केले असून, उपचार सुरू आहेत.
शेगाव तालुक्यातील नागझरी येथील शेतकरी पुरुषोत्तमि‍कसन कराळे (वय ५५) यांनी नापिकीला कंटाळून सोमवारी दुपारी पावणेदोन वाजताच्या सुमारास विष प्राशन केले आणि आपल्या खिशात चिठ्ठी लिहून ठेवली. पुरुषोत्तम कराळे यांना चार मुली आणि एक मुलगा आहे. मुलगा अकोला येथे एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करतो आहे. त्याला पैसा कसा पुरवायचा, घर कसे चालवायचे, अशा विवंचनेत कराळे सापडल्याने त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना अतिदक्षताविभागात दाखल करण्याची आवश्यकता असतानाही त्यांना दाखल करण्यावरून काही वेळ तणाव होता.